दुनिया

सत्तेचा माजः अलिशान गाडी पाठवली नाही म्हणून राज्यपालांच्या मुलाची राजभवनातील अधिकाऱ्याला बेदम मारहाण
दुनिया

सत्तेचा माजः अलिशान गाडी पाठवली नाही म्हणून राज्यपालांच्या मुलाची राजभवनातील अधिकाऱ्याला बेदम मारहाण

भुवनेश्वरः पुरी रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी आलिशान गाडी पाठवली नाही म्हणून ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांच्या मुलाने राजभवनमधील अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या अधिकाऱ्याने हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत आणि पोलिस ठाण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला दाद मिळाली नाही. त्यामुळे पीडित अधिकाऱ्याच्या पत्नीने राजभवनाबाहेर आंदोलन केले.  ओडिशाच्या राजभवन सचिवालयाच्या घरगुती विभागातील सहायक विभाग अधिकारी वैकुंठ प्रधान असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुरी येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन होणार होते. त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली होती. वैकुंठ प्रधान यांनी राज्यपालांचे सचिव शाश्वत मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्यपाल रघुवर दास यांचा मुलगा ललितकुमार आणि त्यांच्या ख...
नेपाळ पुन्हा अस्थिरतेच्या वावटळीत!
दुनिया, राजकारण

नेपाळ पुन्हा अस्थिरतेच्या वावटळीत!

नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने पाठिंबा काढल्यानंतर नेपाळमधील प्रचंड सरकार अल्पमतात आले आहे. म्हणून प्रचंड यांनी राजीनामा देऊन आम्हाला नवीन सरकार बनवायला वाट मोकळी करावी, अशी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मागणी केली आहे. पण एवढ्या सहजासहजी माघार घेतील ते प्रचंड कसले? ६९ व्या वर्षी देखील आपण जिवंत असेपर्यंत नेपाळच्या राजकारणात उलथापालथी चालूच राहतील, असे जाहीरपणे सांगणारे प्रचंड सरकार संकटात आले तरी राजीनामा देण्यास तयार नाहीत. उलट आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे. प्रभाकर ढगे, पणजी गोवा. लोकशाही प्रस्थापनेच्या अवघ्या १६ वर्षात १३ सरकारे अनुभवलेल्या नेपाळमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेचे वारे वाहू लागले आहे. पंतप्रधान पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांच्या आघाडी सरकारमध्ये सहा महिन्यांपूर्वी सहभागी झालेल्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (यूएमएल) या पक्षाने सरकार...
कामाच्या अतिताणामुळे रोबोटने केली पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या, दक्षिण कोरियातील खळबळजनक घटना!
दुनिया, साय-टेक

कामाच्या अतिताणामुळे रोबोटने केली पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या, दक्षिण कोरियातील खळबळजनक घटना!

सेऊलः कामाचा अतिताण, नैराश्य किंवा भावनिक पोकळी निर्माण झाल्यामुळे माणसाने आत्महत्या केल्याचे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. परंतु मध्य- दक्षिण कोरियातील एका नगरपालिकेत तैनात असलेल्या रोबोटने कामाचा ताण सहन न झाल्यामुळे पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या रोबोटने असे का केले? याच्या कारणांचा शोध घेण्यात येईल, असे गुमी शहर नगरपालिकेने म्हटले आहे. वर्षभरापूर्वी हा रोबोट गुमी शहर नगरपालिकेत प्रशासकीय कामकाजात मदतीसाठी तैनात करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात तो पाऱ्याखाली निष्क्रीय अवस्थेत आढळून आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पायऱ्यांवरून उडी मारण्यापूर्वी हा रोबोट इकडे-तिकडे फिरत होता. त्याच्यात काही तरी गडबड असल्यासारखे वाटत होते. या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे गुमी शहर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या रोबोटच...
सूक्ष्मजीवशास्त्र आणि सूक्ष्मजीव
अभिव्यक्ती, दुनिया

सूक्ष्मजीवशास्त्र आणि सूक्ष्मजीव

बहुतांश लोकांना मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र हा शब्द माहिती नाही. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीव आणि विविध क्षेत्रातील त्यांची भूमिका यावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न... -प्रा. डॉ. भारती घुडे-वाडेकर प्रत्येक मायक्रोबायोलॉजिस्टला सूक्ष्मजीवाबद्दल एक तथ्य माहित आहे, ‘जर सूक्ष्मजीव नसतील तर जीवन नाही’. जगभरात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. जे आपल्या जीवनात बदल घडवून आणतात. आपले अन्न सुरक्षित आहे याची खात्री करणे, रोगांवर उपचार करणे आणि प्रतिबंध करणे, हरित तंत्रज्ञान विकसित करणे किंवा हवामान बदलामध्ये सूक्ष्मजीवांच्या भूमिकेचा मागोवा घेणे  इत्यादी बाबींवर ते निरंतर संशोधन-अध्ययन करत असतात. सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी सूक्ष्म जंतू समजून घेऊन अनेक महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांची उत्तरे देण्याचे ध्येय ठेवले आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्...
२४ वर्षांपासून पृथ्वीचा वेग मंदावला, आता तुमच्या घड्याळात होणार ‘हे’ बदल!
दुनिया, साय-टेक

२४ वर्षांपासून पृथ्वीचा वेग मंदावला, आता तुमच्या घड्याळात होणार ‘हे’ बदल!

सॅन डिएगोः पृथ्वीचा आतील गाभा २०१० पासून म्हणजेच २४ वर्षांपासून हळूहळू फिरू लागला आहे. त्यामुळशे दिवसाची लांबी एका सेकंदाच्या अंशाने बदलू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. पृथ्वी सूर्याभोवती सतत फिरत असते. सूर्याभोवती फिरतानाच पृथ्वी आपल्या अक्षावरही फिरत असते. पृथ्वी अक्षावर फिरल्यामुळे दिवस आणि रात्र होते. तर सूर्याच्या परिभ्रमणामुळे ऋतूंमध्ये बदल होतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनात कोर म्हणून ओळखला जाणारा पृथ्वीचा सर्वात आतला थर पूर्वीपेक्षा हळू फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पृथ्वीच्या कोरमध्ये दोन भाग असतात. त्यापैकी एक आतील गाभा तर दुसरा बाह्य कोर असतो. पृथ्वीचा हाच सर्वात आतील गाभा गेल्या २४ वर्षांपासून  म्हणजेच २०१० पासून पूर्वीपेक्षा हळूहळू फिरत आहे. पृथ्वीच्या आतील गाभ्याची फिरण्याची गती मंदावल्यामुळे दिवसाची लांबी एक सेकंदाच्या अंशाने बदलू शकते, असे शास्...
वाढवण बंदर उभारणीस केंद्र सरकारची मंजुरी, जगातील १० मोठ्या बंदरापैकी ठरणार देशातील एकमेव मोठे बंदर
दुनिया, देश

वाढवण बंदर उभारणीस केंद्र सरकारची मंजुरी, जगातील १० मोठ्या बंदरापैकी ठरणार देशातील एकमेव मोठे बंदर

मुंबई: पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर उभारणी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत. जगातील १० मोठ्या बंदरापैकी देशातील वाढवण हे एकमेव मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. सुमारे १२ लाख रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा बनसोडे यांनी व्यक्त केली. वाढवण परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना, मत्स्यव्यवसाय करणारे व या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबवून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण क...
ऑस्कर पुरस्कार २०२४: ‘ओपन हायमर’चा डंका, सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता; एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
दुनिया

ऑस्कर पुरस्कार २०२४: ‘ओपन हायमर’चा डंका, सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता; एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

लॉस एंजेलिसः जगभरातील चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पहात असलेला ऑस्कर २०२४ सोहळा दिमाखात पार पडला असून ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरने डंका गाजवला असून या चित्रपटाला सात ऑस्कर जाहीर झाले आहेत. सिलियन मर्फी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जाहीर झाला आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच सात ऑस्कर जिंकले आहेत. ख्रिस्तोफर नोलनला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर मिळाला आहे. याच चित्रपटातील अभिनयासाठी सिलियन मर्फीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. ओपन हायमरने सर्वोत्कृष्ट ओरिजन स्कोअरचाही पुरस्कार जिंकला आहे. याच चित्रपाटने सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी, सर्वोत्क...
चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून साकारला ‘भारतमाता’ शब्द, वन विभागाच्या उपक्रमाची गिनिज बुकात नोंद
दुनिया, महाराष्ट्र

चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून साकारला ‘भारतमाता’ शब्द, वन विभागाच्या उपक्रमाची गिनिज बुकात नोंद

मुंबई: वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५  हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे. चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५  हजार ७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ या...
टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला, क्रिकेटपटू शोएब मलिकने केले सना जावेदशी तिसरे लग्न!
दुनिया, देश

टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला, क्रिकेटपटू शोएब मलिकने केले सना जावेदशी तिसरे लग्न!

इस्लामाबादः भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केले आहे. त्याने तिसऱ्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटांच्या अफवा अधिक वेगाने पसरू लागल्या होत्या. शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच आज शोएब मलिकने तिसऱ्या लग्न सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका समारंभात शोएब आणि सना यांचा निकाह झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीशी, दुसरे लग्न सानिया मिर्झाशी तर तिसरे लग्न सना जावेदशी झाले आहे. शोएब आणि सना जावेद ए...
छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीमध्ये तीन दिवस वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन, ‘या’ तारखा ठेवा राखून!
दुनिया, देश

छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीमध्ये तीन दिवस वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन, ‘या’ तारखा ठेवा राखून!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित केला जाणारा वेरुळ-अजिंठा महोत्सव यंदा २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे होत आहे. या महोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे आदी उपस्थित होते. पर्यटन विभागाचे विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महाम...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!