राजकारण

फडणवीस- बावनकुळेंची नागपुरात धक्कादायक नामुष्की, १३ पंचायत समित्यांमध्ये भाजपची पाटी कोरीच!
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

फडणवीस- बावनकुळेंची नागपुरात धक्कादायक नामुष्की, १३ पंचायत समित्यांमध्ये भाजपची पाटी कोरीच!

नागपूरः जंग जंग पछाडून राज्याची सत्ता हस्तगत करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा गृह जिल्हा नागपुरातच धक्कादायक नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीत भाजपला एकही सभापतिपद जिंकता आलेले नाही. या १३ पंचायत समित्यांपैकी ९ पंचायत समित्यांत काँग्रेस तर ३ पंचायत समित्यांचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेले असून एका ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे. पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती असेः काँग्रेसः सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, कामठी, मौदा, कुही, उमरेड, भिवापूर, नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसः कोटोल, नरखेड आणि हिंगणा. बाळासाहेबांची शिवसेनाः रामटेक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असूनही ...
अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी

औरंगाबाद: सिल्लोडचे एकेकाळी काँग्रेसचे, आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. त्यांच्या कामाचा 'झपाटा' एवढा आहे की ते वेळकाळही पहात नाहीत. त्यामुळेच त्यांनी शनिवारी सायंकाळी अंधारून आलेले असतानाही 'दिवे' लावून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे 'कृतीशील' लोकप्रतिनीधी म्हणूनच ओळखले जातत. तशी त्यांची प्रत्येकच 'कृती' आगळीवेगळी असते आणि म्हणूनच ती चर्चेचा विषयही ठरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याला त्यांनी शंभर बसेस भरून लोक पाठवले होते. त्याची औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडेच भरपूर चर्चा झाली. ही चर्चा थांबते न थांबते...
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर
महाराष्ट्र, राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने १६६ - अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुटी अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे  जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील.  या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ...
एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र, राजकारण

एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

यवतमाळः राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थी आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे. मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत, म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला आहे. एसटीचे कर्मचारी स्वार्थी आहेत. ते केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत. ते या लुटीवर बोलत नसतील तर तेही या लुटीत सहभागी आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.  सध्या राज्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आ...
मोदींची नक्कल भोवली, शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल, म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने….
महाराष्ट्र, राजकारण

मोदींची नक्कल भोवली, शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल, म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने….

मुंबईः शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ‘प्रक्षोभक भाषण’ केल्याप्रकरणी शिवसेनेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विनायक राऊत, आ. भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा? पोलिसांच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देईन, असे अंधारे म्हणाल्या. हेही वाचाः ‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यात आली. अन्य नेत्या...
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
महाराष्ट्र, राजकारण

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबईः पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालयनालयाने (ईडी) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत यांनी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर २७  सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. न्यायालयाने ही सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगावच्या पत्राचाळीतील १ हजार ३९ कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. पत्राचाळ पुनर्विकासात खासदार संजय र...
सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार
महाराष्ट्र, राजकारण

सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावे, अशा मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार यांनी मात्र अगदी मोज...
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य
राजकारण

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य

पिंपरीः राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे कोरोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे कोणालाही मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. विद्यमान आमदार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, असे वाटते, असे अजित पवार म्हणाले. मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहे. या निवडणुका घेण्यासाठी वेळ लावण्याचे काहीच कारण नाही. मुंबईतील अंधेरी विधानसभेची...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!