महाराष्ट्र

राज्यात माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे स्थापणार नवीन न्यायालये
महाराष्ट्र, विशेष

राज्यात माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे स्थापणार नवीन न्यायालये

मुंबईः  राज्यात माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रायगड-अलिबाग जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येवून २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येईल. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी १४ नियमित पदे व एक पद बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येईल. यासाठी २० पदांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता ९८ लाख ८३ हजार ७२४ इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, बेलापूर हे जिल्हा न्यायाधीश व अ...
‘भाच्या’च्या कुरापतीमुळे ‘मामा’ अडचणीत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात चौकशीच्या फेऱ्यात!
महाराष्ट्र, राजकारण

‘भाच्या’च्या कुरापतीमुळे ‘मामा’ अडचणीत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात चौकशीच्या फेऱ्यात!

मुंबईः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षादेश झुगारून निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उतरलेले सत्यजित तांबे यांच्या कुरापतीमुळे ज्येष्ठ काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातही अडचणीत सापडले आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे स्वतः महाराष्ट्रात येऊन नाशिकमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल थोरात यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे सख्खे मामा आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला होता. परंतु उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपेर्यंत डॉ. सुधीर तांबे उमेदवारी अर...
सत्यजित तांबे काँग्रेसमधून निलंबित, बंडखोरीमुळे प्रदेश काँग्रेसची कारवाई
महाराष्ट्र, राजकारण

सत्यजित तांबे काँग्रेसमधून निलंबित, बंडखोरीमुळे प्रदेश काँग्रेसची कारवाई

मुंबईः  काँग्रेसमध्ये बंडखोरी करून विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचा आदेश झुगारून नाशिकमधून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आलेले आहे. ही कारवाई आजच करण्यात आली आहे. तांबे परिवाराचे काय झाले? याबाबतचे प्रश्न आता आम्हाला विचारू नये. कारण त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले आहे. राहिला प्रश्न बाळासाहेब थोरातांचा तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रूग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असे नाना पटोले म्हणाले. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघात सध्या निवडणूक होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झु...
समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाईलमध्ये  हवेत गोळीबार, फुलंब्री पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाईलमध्ये हवेत गोळीबार, फुलंब्री पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा

औरंगाबादः नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ कार उभी करून फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर गोळीबार करणाऱ्या युवकाविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या युवकाचा शोध घेत आहेत. समृद्धी महामार्गावर सावंगी बोगद्याजवळ १४ डिसेंबर रोजी हा फिल्मी स्टाईल थरार करून त्याचा व्हिडीओ करण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. बाळू गायकवाड असे हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सावंगी बोगद्यासमोर  एमएच २०- एफजी २०२० क्रमांकाची स्कॉर्पिओ उभी करण्यात आली. या स्कॉर्पिओच्या मागून गॉगल घातलेला, गळ्यात चेन, पायात स्पोर्ट्स शूज, मनगटावर दोरे आणि हातात घड्याळ असलेला काळे टी शर्ट घातलेला एक तरूण स्टाईलमध्ये हातात बंदूक घेऊन या स्कॉर्पिओसमोर येतो आणि...
आईबहिणीवरून शिव्या देता येत असतील तर भाजपचे राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या, आम्ही फुले उधळूः खा. राऊतांचे शिंदे गटाला आव्हान
महाराष्ट्र, राजकारण

आईबहिणीवरून शिव्या देता येत असतील तर भाजपचे राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या, आम्ही फुले उधळूः खा. राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

नाशिकः  ‘गद्दार’ म्हटल्यावर मला कोणी शिव्या देत असेल तर तो माझा सन्मान समजतो. कारण ते ‘गद्दार’ आहेत. त्यांना आई-बहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी त्या  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते आणि मंत्र्यांना द्याव्यात. आम्ही शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. चित्रपटामध्ये जसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे कोरले होते, तसेच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ कोरले आहे. याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, अशी टीका खा. राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली होती. राऊतांच्या या टिकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती आणि त्यांनी राऊतांना शिव्या घातल्या होत्या...
राज्यात प्लास्टिक बंदी आदेशात सुधारणाः एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमच्याच्या उत्पादन व वापरास परवानगी
महाराष्ट्र, साय-टेक

राज्यात प्लास्टिक बंदी आदेशात सुधारणाः एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमच्याच्या उत्पादन व वापरास परवानगी

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनवण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणेबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालय वार्ताहर संघात पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर, उपसचिव, चंद्रकांत विभुते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यावेळी उपस्थित होते. प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन बंदीबाबत पर्यावरण विभागाच्या शक्तीप्रदत्त समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बै...
विद्यापीठाच्या नवीन गेटच्या वादात ‘दिव्य’ मांडवलीचा पर्दाफाश; ना स्ट्रक्चरल ऑडिट, ना तज्ज्ञांची शिफारस, हे घ्या पुरावे
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठाच्या नवीन गेटच्या वादात ‘दिव्य’ मांडवलीचा पर्दाफाश; ना स्ट्रक्चरल ऑडिट, ना तज्ज्ञांची शिफारस, हे घ्या पुरावे

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी दहा फुटाच्या अंतरावर बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रवेशद्वाराचा वाद चिघळत चालला आहे. या नवीन प्रवेशद्वाराला ज्येष्ठ आंबेडकरवादी नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे नवीन प्रवेशद्वार विद्यापीठाच्या वैभवात कशी ऐतिहासिक भर घालणार आहे, असे ठसवण्याचे ‘दिव्य’ प्रयत्न होत असतानाच विद्यापीठ प्रशासनाने शेतीच्या बांधावर करावी तशीच मनमानी कामे हाती घेतल्याचे पुरावेच न्यूजटाऊनच्या हाती लागले आहेत. ज्या मुख्य प्रवेशद्वाराचे जतन आणि संवर्धन करण्याच्या नावाखाली विद्यापीठ प्रशासन ‘अशैक्षणिक कामावर’ कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत आहे, ते काम हाती घेण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराचे ना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, ना तज्ज्ञ समिती गठीत करून त्यांचा अहवाल मागवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!