महाराष्ट्र

गाजवा मैदानः २४ जानेवारीपासून मुंबईत राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा!
महाराष्ट्र

गाजवा मैदानः २४ जानेवारीपासून मुंबईत राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा!

मुंबई: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २६ वी आणि महिलांची २१ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २७ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छूकांनी २० जानेवारी पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून कामगार कबड्डी स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे.  महिलांसाठी ही स्पर्ध...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे आणि बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन
महाराष्ट्र, विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे आणि बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन

मुंबई:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. ३, ४, ७ व ८ डिसेंबर रोजी आयोजित केले असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्...
आता वर्षातून चारवेळा मतदार नोंदणी, छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध
देश, महाराष्ट्र

आता वर्षातून चारवेळा मतदार नोंदणी, छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

मुंबई:  सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी  मत...
शरद पवारांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
देश, महाराष्ट्र

शरद पवारांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पुढील तीन दिवस त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस शरद पवार ब्रीच कँडीमध्ये उपचार घेणार आहेत. त्यांना २ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे गर्जे यांनी पत्रकात म्हटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर...
प्रकाश आंबेडकर- एकनाथ शिंदे यांच्यात अडीचतास खलबते, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र, विशेष

प्रकाश आंबेडकर- एकनाथ शिंदे यांच्यात अडीचतास खलबते, राजकीय चर्चांना उधाण

मुंबईः वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणाची नांदी घातली जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बुधवारी रात्री जवळपास अडीचतास खलवते सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील बाहेर आला नसला तरी या दोन नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर हे बुधवारी रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अडीचतास चर्चा झाली. या दोघांच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत दोघांकडून काहीही सांगण्यात आले नसले तरी प्रकाश आ...
सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ
देश, महाराष्ट्र

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ

मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे २४ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. यात सुधारणा करुन नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमं...
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार: विखे
महाराष्ट्र

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार: विखे

मुंबई: राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  बुधवारी दिले. शेळी-मेंढीपालन सहकारी संस्थेच्या योजनांच्या अनुषंगाने एनसीडीसीचे सादरीकरण मंत्रालयात आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी विखे-पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे महाव्यवस्थापक विनीत नारायण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीतील भूखंड वाटपावरील स्थगिती अखेर उठवली, राज्यातील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीतील भूखंड वाटपावरील स्थगिती अखेर उठवली, राज्यातील गुंतवणुकीचा मार्ग मोकळा

मुंबईः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटप करण्यावर राज्य सरकारने दिलेली स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात गुंवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भूखंड वाटपावरील स्थगितीमुळे राज्यातील १६ हजार ५०० कोटींचे गुंतवणुकीचे प्रस्ताव रखडल्याचे वृत्त न्यूजटाऊनने दिले होते. एमआयडीसीने १ जून २०२२ नंतर विविध स्तरावर वाटप केलेल्या भूखंड वाटपाच्या निर्णयास राज्य सरकारने ८ ऑगस्ट २०२२ रोजी स्थगिती दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळातील १२ हजार कोटींची गुंतवणुकीचे १९१ प्रस्ताव धूळखात पडून आहेत. या स्थगितीमुळे विद्यमान सरकारमधील ४ हजार ५०० कोटींच्या गुंतवणुकीचे १५० प्रस्ताव रखडले होते. हेही वाचाः उद्योगांसाठी भूखंड...
न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, विशेष

न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध स्तरावर भूखंड वाटपाला  देण्यात आलेली स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे. न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त दिले होते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याचे म्हटले. मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे...
‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा
महाराष्ट्र, विशेष

‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली. या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही 'भामटेगिरी' उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ 'शोभेची वस्तू' असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचा...