ज्यांचे वय डोळे मारण्याचे, ते डोळे मारतात: नृत्यांगना गौतमी पाटीलच्या प्रश्नावर मंत्री अब्दुल सत्तारांची टिप्पणी
छत्रपती संभाजीनगरः ज्यांचे वय डोळे मारण्याचे, ते डोळे मारतात. आजकाल डोळे मारण्याचा सीझन सुरू आहे. ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते आता डोळे मारू लागले आहेत, अशी टिप्पणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलबाबत विचारलेल्या प्रश्नावर केली.
महाराष्ट्रभर सध्या चर्चा आहे ती नृत्यांगना गौतमी पाटीलची. राज्यात अनेक ठिकाणी यात्रा, वाढदिवसानिमित्त तिच्या डान्स शोचे आयोजन केले जाते. पुण्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने एका बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता ‘तुला काय वाईट वाटले. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला काय त्रास होतो?,’ अशी मिश्कील टिप्पणी केली होती.
अजित पवारांच्या या टिप्पणीवर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार ...