साडेतीनशे पन्नास किमी कशाला म्हणतात?, भरसभेत अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या चुकांवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी भरसभेत त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील मेट्रोच्या विस्ताराची माहिती देताना आम्ही साडेतीनशे पन्नास किलोमीटर मेट्रोलाइम टाकली, असे वक्तव्य केले होते. त्याचाही अजित पवारांनी समाचार घेतला. साडेतीनशे पन्नास किमी कशाला म्हणतात? गणिताचे विद्यार्थी तर तोंडात बोटच घालतील, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीची तिसरी विराठ वज्रमूठ सभा मंगळवारी महाराष्ट्रदिनी बीकेसीच्या मैदानात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यासभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जोरदार टोलेबाजी केली. माझ्याविषयी सध्या कंड्या पिकवल्य...