देश

चीनमध्ये उद्रेक करणाऱ्या कोरोना व्हेरिएंटच्या चार केस भारतात, गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य
देश

चीनमध्ये उद्रेक करणाऱ्या कोरोना व्हेरिएंटच्या चार केस भारतात, गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य

नवी दिल्लीः  चीनमध्ये ज्या ओमीक्रॉनच्या बीएफ ७ व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला, त्या व्हेरिएंटचे चार बाधित रूग्ण भारतात आढळून आले आहेत. गुजरात आणि ओडिशात हे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, चीनसह अन्य काही देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे भारत सरकारची आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य, लसीकरण पूर्ण करण्यासोबतच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी देशातील सर्व राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ओमीक्रॉनच्या बीएफ ७ व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे मानले जात आहे. याच व्हेरिएंटमुळे बाधित झालेले रूग्ण अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्कसह अनेक युरोपीयन देशातही आढळून आले आहेत. मागील काही महिन्यांपासून चीनमध्ये कोर...
टी-२० वर्ल्ड कपः भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, विराट कोहलीने पाकच्या खिशातून खेचून आणली विजयश्री!
दुनिया, देश, विशेष

टी-२० वर्ल्ड कपः भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, विराट कोहलीने पाकच्या खिशातून खेचून आणली विजयश्री!

मेलबर्नः टी-२० विश्वचषक क्रिकेटमध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या आणि रोमांचक महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करून वर्ल्ड कपची दमदार सुरूवात केली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने सुरूवातीच्या धक्क्यांनंतर लडखडू लागलेल्या भारतीय संघाला सावरले आणि शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. विराटने आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि आवश्यक असलेला रनरेट कायम राखला. विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा ठोकल्या. विराटच्या या शानदार खेळीमुळे पाकिस्तानच्या खिशातून विजयश्री खेचून आणली. आयसीसीनेही विराटचे कौतुक केले आहे. ‘किंग परतला! सलाम विराट कोहली!’  असे ट्विट करून आसीसीने विराटला सलाम ठोकला आहे.  तत्पूर्वी नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला आधी फलंदाजी...
अर्थव्यवस्था सुस्तावली: आरबीआयने वाढवला रेपो रेट; गृह कर्जासह सर्व कर्जे महागणार!
देश, विशेष

अर्थव्यवस्था सुस्तावली: आरबीआयने वाढवला रेपो रेट; गृह कर्जासह सर्व कर्जे महागणार!

मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ आधार अंकाच्या वाढीची घोषणा केली आहे. गेल्या आठ महिन्यात रेपो रेटमध्ये आरबीआयने केलेली ही पाचवी वाढ आहे. या वाढीमुळे रेपो रेट आता ५.९ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर गेला आहे. या रेपो रेट वाढीचा परिणाम गृह कर्जे आणि बँकांकडून इतर बाबींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये आर्थिक विकास दराचा अंदाज ७ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर आला आहे. याचाच अर्थव्यवस्था वाढीचा वेग सुस्तावला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निर्णय शक्तिकांत दास यांनी जाहीर केले. वाढती महागाई हा आरबीआयच्या चिंतेचा मुख्य विषय आहे, मात्र सरकारला वाढत्या महागाईवर नियंत्रण आणताना दिसून येत नाही. त्याचा परिणाम आरबीआयच्या चलन धोरणावर स्पष्ट दिसू लागला आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७७ ट...
इंदिरा गांधींच्या नातू सोबत बाळासाहेब ठाकरेंचा नातूही ‘भारत जोडो’ यात्रेत साथ-साथ!
देश, महाराष्ट्र, राजकारण

इंदिरा गांधींच्या नातू सोबत बाळासाहेब ठाकरेंचा नातूही ‘भारत जोडो’ यात्रेत साथ-साथ!

हिंगोलीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काश्मीर ते कन्याकुमारी ही ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यातून ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीत या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. इंदिरा गांधींच्या नातूसोबत बाळासाहेब ठाकरेंचाही नातू या भारत जोडो यात्रेत साथ- साथ चालतानाची दृश्ये या पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना सुखावणारी ठरली. दोन भिन्न विचारणीच्या राजकीय पक्षात काम करणारे दोन नातू एकाच पदयात्रेत चालतानाची दृश्ये टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांचीही झुंबड उडाली होती!  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्याचा पाहुणाचार घेऊन आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. रस्त्यांच्या दुतर्फा खच्चून झालेली गर्दी, युवा वर्गाच्या आशेचा नवा किरण आणि नव्या उमेदीच्या कार्यकर्त्...
पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ
देश, विशेष

पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात  साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ

मुंबई:  फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची पुरोगीमी ओळख आता इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हावा त्या दिशेने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरोगामी राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांचा चित्ररथ सामील करणार आहे. हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर होणारे दैवतीकरण तर नाही ना?  असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोट नुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आ...
कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार
देश, महाराष्ट्र, विशेष

कर्नाटकच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा विधिमंडळात एकमुखाने निषेध ठराव, सीमा भागातील इंच न् इंच जमीन महाराष्ट्रात आणणार

नागपूर: कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा भागातील इंच न् इंच जमीन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्याचा आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दोन्ही सभागृहांत मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठ...
चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी
देश, राजकारण

चार-दोन उद्योगपतींनी देश ओरबाडायचा असा हिंदुस्तान होऊ देणार नाही: राहुल गांधी

शेगाव: दोन-तीन उद्योगपतींनी देशाचा सर्वच्या सर्व पैसा ओरबाडायचा आणि देशातील युवांच्या स्वप्नांचा चुराडा करायचा, असा हिंदुस्तान आम्हाला नको आहे. असा हिंदुस्तान आमचा नाही आणि असा हिंदुस्तान आम्ही बनूही देणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज शेगावमध्ये पोहोचली. या यात्रेदरम्यानची महाराष्ट्रातील शेवटची सभा शेगावमध्ये झाली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. यापैकी कोणीही द्वेष, हिंसा,तिरस्काराची भाषा केली नाही. त्यांनी प्रेमाचा, लोकांना जोडण्याचाच संदेश दिला. द्वेष, हिंसा, तिरस्कारामुळे कोणाचा फायदा झाला काय? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारला. यात्राची गरज काय? या यात्रेचा फायदा काय? असे सव...
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन, अर्बन नक्षलवाद प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा
देश

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना जामीन, अर्बन नक्षलवाद प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबईः  अर्बन नक्षलवादाच्या आरोपाखाली दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, लेखक प्रा. अनिल तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रा. तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने १४ एप्रिल २०२० रोजी अटक केली होती.  अर्बन नक्षलवाद प्रकरणी एप्रिल २०२० मध्ये अटक केल्यापासन प्रा. आनंद तेलतुंबडे हे तळोजा तुरूंगात बंदिस्त आहेत. प्रा. तेलतुंबडे यांनी नियमित जामिनासाठी केलेली याचिका न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांनी योग्य ठरवली. रोख रक्कम सादर करून जामिनावर सुटका करण्याची तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी केलेली मागणीही न्यायालयाने मान्य केली. विशेष न्यायालयाने प्रा. तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई...
काँग्रेस नेते राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी
देश, राजकारण

काँग्रेस नेते राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

इंदूरः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असतानाच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये दाखल होण्याच्या आधीच त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मिठाईच्या  दुकानाबाहेर हे पत्र आढळून आले आहे. हे पत्र आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हे पत्र मिठाईच्या दुकानाबाहेर सोडून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे हे पत्र शुक्रवारी सकाळी इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर आढळून आले आहे. मिठाईच्या दुकानाबाहेर एक अज्ञात व्यक्ती हे पत्र सोडून गेली आहे. ...
सावरकरांवरील वक्तव्याचा वादः एकनाथ शिंदे गटाच्या फिर्यादीवरून राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल
देश, राजकारण

सावरकरांवरील वक्तव्याचा वादः एकनाथ शिंदे गटाच्या फिर्यादीवरून राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ठाण्यातील नेत्या वंदना सुहास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून ठाणेनगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे वंदना सुहास डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून ठाणे नगर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ५०० आणि ५०१ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!