निवडणुकीत अधिकाऱ्याशी हेतुतः दुजाभाव, जातीवाचक शेरेबाजी अंगलट; धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासेंविरूद्ध आयोगाचा कारवाईचा बडगा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शीपणे सुरळितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य न करता पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात हयगय करून पूर्वग्रह मनात बाळगून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर जातीवाचक शेरेबाजी करणे धाराशिवचे (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या चांगलेच अंगलट आले असून लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या कृत्याची गंभीर दखल घेत भारत निवडणूक आयोगाने त्यांची सुनावणी लावली आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण असल्यामुळे या सुनावणीनंतर डॉ. ओम्बासेंविरुद्ध नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी २९ नोव्हेंबर २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाकडे त्यांचा सविस्तर लेखी तक्रारवजा अहवाल पाठवला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणून गुलामाप्रमाणे वागणू...