प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालये, तक्रार निवारणासाठी कामगार हेल्प लाईन
मुंबई: राज्यातील कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी गुरूवारी केली.
कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक विभागाची ११३ वी बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी राज्यातील प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी मंत्री डॉ.खाडे यांनी मान्यता दिली. या बैठकीस आमदार श्रीमती उमा खापरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कर्मचारी राज्य विमा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंडळ सदस्य उपस्थित होते.
कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी उद्योग असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार रुग्णालय बांधण्याच्या सूचना केल्या. त...