आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले, मनोजभाई संसारे यांचे निधन


मुंबईः आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते मनोज संसारे यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील झुंजार लढवय्या म्हणून त्यांची ख्याती होती.

दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. मनोज संसारे हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे.

मनोज संसारे हे महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून मनोज संसारे यांची कारकिर्द लक्षणीय ठरली होती.

मनोज संसारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संसारे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. विशेषतः महाराष्ट्रातील आंबेडकरी तरूणांमध्ये मनोज संसारे यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *