कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर


मुंबई: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्यूसमधील पोषक तत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बहुतेक लोक मोसंबी आणि डाळिंबाचा रस पिणे पसंत करतात; परंतु हा रस जास्ती गोड असल्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अननसाचा रस अधिक फायदेशीर ठरू शकते. अननसात (Pineapple) ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अननस हे लिंबूवर्गीय फळ असून ते चरबीदेखील कमी करण्यास मदत करते.

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अननस हा सर्वांत उत्तम पर्याय मानला जातो. अननसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मोठ्या प्रमाणात आढळते.

अननसात भरपूर जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रोटीन घटक असतात. याच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलही कमी होऊ शकते. एका अहवालानुसार, अननसमध्ये आढळणारे ब्रोमेलेन रक्तातील चरबी कमी करून बंद झालेल्या धमन्या उघडण्याचेही काम करते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे स्लो ब्लड सर्कुलेशन सुधारते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *