कुलगुरु डॉ. विजय फुलारी, डॉ. संजय भावेंना एनसीसीची ‘कर्नल कमांडंट’ उपाधी, देशातील १३ कुलगुरुंचा सन्मान


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना महासंचालनालयाने देशातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना अवैतनिक ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) महासंचालनालयाच्या वतीने नुकतेच एक राजपत्र प्रकाशित करून देशातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना एनसीसीमध्ये अवैतनिक ‘कर्नल कमांडंट’ उपाधी जाहीर करण्यात आली आहे.ब्रिगेडीयर संजीव कोहली यांनी ही घोषणा केली.
संरक्षण मंत्रालयाच्या सेना शाखेअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) या सन्मानासाठी महाराष्ट्रातून दोन कुलगुरुंची वर्णी लागली आहे. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी आणि दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय भावे यांचा समावेश आहे.
डॉ.फुलारी हे २४ जून २०२४ पासून कुलगुरुपदी कार्यरत आहेत. गेल्या सव्वावर्षाच्या काळात नॅकच्या फेरमूल्याकंनात ‘ए प्लस’ मानांकन, ’एनआयआरएफ’ मध्ये टॉप ५० विद्यापीठात स्थान, पीएम-उषा अंतर्गत १०० कोटींचा निधी यासह अनेक महत्वपूर्ण उपलब्धी या काळत प्राप्त करुन दिल्या आहेत. कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपेपर्यंत डॉ. फुलारी आणि डॉ. भावे यांच्याकडे ही अवैतनिक उपाधी राहील.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!