२०२६ मध्ये २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, भाऊबीजेच्या दिवशी अतिरिक्त सुट्टी; वाचा संपूर्ण यादी


मुंबईमहाराष्ट्र सरकारने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. याशिवाय भाऊबीजेच्या दिवशी (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्री, लक्ष्मीपूजनाची सार्वजनिक सुट्टी रविवारी आली आहे तर महाराष्ट्र दिन व बुद्ध पोर्णिमा, स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष दिन या सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्या आहेत.

‘या’ दिवशी असेल सार्वजनिक सुट्टी

  • प्रजासत्ताक दिनः सोमवार, २६ जानेवारी २०२६
  • महाशिवरात्रीः रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंतीः गुरूवार, १९ फेब्रुवारी २०२६
  • होळी (दुसरा दिवस):  मंगळवार, ३ मार्च २०२६
  • गुढी पाडवाः गुरूवार, १९ मार्च २०२६
  • रमझान ईद (ईद-उल-फित्र):  शनिवार, २१ मार्च २०२६
  • रामनवमीः गुरूवार, २६ मार्च २०२६
  • महावीर जन्म कल्याणकः मंगळवार, ३१ मार्च २०२६
  • गुड फ्रायडेः शुक्रवार, ३ एप्रिल २०२६
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीः मंगळवार, १४ एप्रिल २०२६
  • महाराष्ट्र दिनः शुक्रवार, १ मे २०२६
  • बुद्ध पोर्णिमाः शुक्रवार, १ मे २०२६
  • बकरी ईद (ईद-उल-झुआ):  गुरूवार, २८ मे २०२६
  • मोहरमः शुक्रवार, २६ जून २०२६
  • स्वातंत्र्य दिनः शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
  • पारशी नववर्ष दिनः शनिवार, १५ ऑगस्ट २०२५
  • ईद-ए-मिलादः बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
  • गणेश चतुर्थीः सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
  • महात्मा गांधी जयंतीः शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६
  • दसराः मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६
  • दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन): रविवार, ८ नोव्हेंबर २०२६
  • दिवाळी (बलिप्रतिपदा):  मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
  • भाऊबीजः बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ (अतिरिक्त सुट्टी)
  • गुरू नानक जयंतीः मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६
  • ख्रिसमसः शुक्रवार, २५ डिसेंबर २०२६
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!