चौपदरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर- पैठण रस्त्यावरील वाहतूक वळवली, १८ ऑक्टोबरपर्यंत करा ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-इ छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याठिकाणची रहदारी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दि.१८ ऑक्टोबरपर्यंत ही वाहतूक याच पर्यायी मार्गाने होणार आहे.
प्रतिबंधित केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे. वाहनधारकांनी निर्धारित करून दिलेल्या पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रहदारीतील बदल असे-
१.कचनेर-निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा, बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी एन्ड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा- बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.
२.छत्रपती संभाजीनगर- निजलगाव फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर- निजलगाव फाटा-बिडकीन-शेकटा फाटा- एन्ड्युरन्स कंपनी जवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगावमार्गे कचनेरकडे जातील.
३.वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- बिडकीन- निजलगाव फाटा- बिडकीन डीएमआयसी- निजलगाव मार्गे कचनेरकडे जाणारी वाहने वाळूज- शेंदुरवादा- शेकटा- शेकटा फाटा- एनड्युरन्स कंपनीजवळून- बिडकीन डीएमआयसी- निजलगावमार्गे कचनेरकडे जातील.
४.कचनेर- निजलगाव-बिडकीन डीएमआयसी- निजलगाव फाटा- बिडकीन- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादामार्गे वाळूज कडे जाणारी वाहने कचनेर- निजलगाव- बिडकीन डीएमआयसी- एनड्युरन्स कंपनीजवळून- शेकटा फाटा- शेकटा- शेंदुरवादा मार्गे वाळूजकडे जातील.
१८ ऑक्टोबरपर्यंत हे बदल लागू राहतील. प्रतिबंधित केलेल्या मार्गावर वाहनांची ये- जा बंद करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!