छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मौजे रायपूर शिवार येथे गंगापूर व खुलताबाद तालुका उमुमी इस्तेमा इन्तेजामीया कमेटीच्या वतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय मुस्लिम धार्मिक तबलीगी इज्तेमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत या भागात भाविकांची ये-जा असेल. त्यामुळे कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी, लासूर ते रायपूर तसेच कसाबखेडा फाटा ते शिऊर बंगला या भागातील रहदारी सुरळीत रहावी यासाठी वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत.
वाहतूक मार्गावरील बदल असे
छत्रपती संभाजीनगर ते देवगाव-शिऊर बंगला मार्गे वैजापूर-येवला- नाशिककडे जाणारी जड वाहतूक-
- छत्रपती संभाजीनगर- ए.एस.क्लब-लासूर-वैजापूरमार्गे पुढे येवला नाशिकडे जातील.
- छत्रपती संभाजीनगर- ए.एस.क्लब-करोडी टोल नाका-समृद्धी महामार्गमार्गे वैजापूर-येवला नाशिकडे जातील.
- छत्रपती संभाजीनगर-ए.एस.क्लब-करोडी टोल नाका-कसाबखेडा फाटा-गल्लेबोरगाव फाटा-देवगाव रंगारी-शिऊर बंगलामार्गे पुढे जातील.
नाशिक-येवला-वैजापूर-शिऊर बंगला-देवगाव रंगारीमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक-
- नाशिक-येवला-वैजापूर-लासूर-ए.एस.क्लबमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.
- नाशिक-येवला-वैजापूर-समृद्धी महामार्गमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
- नाशिक-येवला-वैजापूर-शिऊर बंगला-देवगाव रंगारी-गल्लेबोरगावमार्गे कसाबखेडा फाटा-छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
वाहतूक मार्गातील बदल हे ३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील, असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळवले आहे.