राष्ट्रवादी काँग्रेसची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर: गंगापूरमधून सतीश चव्हाण; ठाकरे गटाचीही तिसरी यादी जाहीर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ६७ झाली आहे.
आज उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सतीश चव्हाण यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांना गंगापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाऩ हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण हे अजित पवार गटात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अजित पवार गटातून नुकतेच बाहेर पडलेले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनाही शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीची दुस...