मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ६७ झाली आहे.
आज उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सतीश चव्हाण यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांना गंगापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाऩ हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण हे अजित पवार गटात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुतारी हाती घेत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अजित पवार गटातून नुकतेच बाहेर पडलेले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनाही शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीची दुसरी यादी अशी
१. गंगापूर: सतीश चव्हाण
२. दिंडोरी: सुनिता चारोसकर
३. फलटण: दीपक चव्हाण
४. माळशिरस: उत्तम जानकर
५. इचलकरंजी: मदन कारंडे
६. एरंडोल: सतीश पाटील
७. परंडा: राहुल मोटे
८. बीड: संदीप क्षीरसागर
९. येवला: माणिकराव शिंदे
१०. खडकवासला: सचिन दोडके
११. पर्वती: अश्विनी कदम
१२. उल्हासनगर: ओमी कलानी
१३. शहापूर: पांडुरंग वरोरा
१४. आर्वी: मयुरा काळे
१५. बागलान: दिपिका चव्हाण
१६. सिन्नर: उदय सांगळे
१७. नाशिक पूर्व: गणेश गीते
१८. जुन्नर: सत्यजीत शेरकर
१९. चांदगड: नंदिनीताई कुपेकर
२०. अहिल्यानगर(अहमदनगर): अभिषेक कळमकर
२१. अकोले: अमित भांगरे
२२. पिंपरी: सुलक्षणा शिलवंत
ठाकरे गटाची तिसरी यादी
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज सकाळीच दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यात १५ उमेदवारांची नावे होती. आता तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात तीन उमेदवारांचा समावेश आहे.
१. वर्सोवा: हारून खान
२. घाटकोपर पश्चिम: संजय भालेराव
३. विलेपार्ले: संदीप नाईक