रेपो रेट जैसे थे: कर्ज आणि ईएमआयचा बोजा वाढणार नाही, कर्जदारांना पुन्हा दिलासा!


मुंबईः  भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कर्जदारांना सलग तिसऱ्यांदा दिलासा देत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे जाहीर केले आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आज १० ऑगस्ट रोजी संपली. या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्यामुळे कर्ज आणि आएमआयचा बोजा वाढणार नसल्यामुळे कर्जदारांना विशेष दिलासा मिळणार आहे.

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ८,९ आणि १० ऑगस्ट दरम्यान झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. आरबीआयने रेपो रेट कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलनविषयक धोरण  समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता.

 गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून आरबीआयने रेपो रेटमध्ये २.५ टक्के वाढ केली होती. परिणामी सर्व प्रकारची कर्जे महागली. अनेक दिवसांपासून लोक कर्ज स्वस्त होण्याची वाट पहात होते. देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी मे २०२२ पासून आरबीआयने रेपो रेटमध्ये सलग वाढ केली. परिणामी फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो रेट ६.५ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर आरबीआयने एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *