शाब्बास रे वाघा! चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या मनोजचे तोंडभर कौतुक, पण पोलिसांनी नोंदवले हाफ मर्डरसह गंभीर गुन्हे


पुणेः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणारा समता सैनिक दलाचा संघटक मनोज गरबडेंवर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी या कृत्याबद्दल मनोज व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह गंभीरस्वरुपाचे गुन्हे नोंदवले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठाच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी आंदोलने करून चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशा तक्रारी पोलिसांत दाखल केल्या.

औरंगाबादचा दौरा आटोपून चंद्रकांत पाटील हे पुण्याला पोहोचले. पिंपरी चिंचवड येथील नियोजित कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते भाजपचे पदाधिकारी मनोज शेडगे यांच्याकडे चहापानासाठी थांबले होते. तेथून निघत असताना समता सैनिक दलाचा संघटक मनोज घरबडे या ३४ वर्षीय कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाई फेकली. मनोजसोबत धनंजय इजगज आणि विजय ओव्हळ हे कार्यकर्तेही होते.

मनोज घबरडेंनी चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाई फेकून निषेध नोंदवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर मनोजवर अभिनंदनाचा वर्षावर सुरू झाला. शाब्बास रे वाघा! म्हणत मनोजचे अनेकांनी कौतुक केले आणि त्याला मानाचा जयभीमही ठोकला आहे. त्याचबरोबर मनोज घरबडे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मागे समाजाने खंबीरपणे उभे टाकले पाहिजे. त्यांना एकटे सोडू नये, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यातील या काही बोलक्या प्रतिक्रियाः

महापुरूषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटीलवर शाईफेक करणारा हा मनोज गरबडे!!  मानाचा जयभीम!

अनुज पाठक

समता सैनिक दलाच्या वाघाला क्रांतिकारी जयभीम. भिकारचोट चंद्रकांत पाटील. चंपावर पिंपरीमध्ये तोंडाला काळे फासले!

प्रशांत देठे.

चंद्रकांत पाटीलवर शाईफेक करणाऱ्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान आहे.

अमरजित पाटील.

आज मनोजभाऊच्या सुटकेसाठी संपूर्ण समाजाने भाऊच्या पाठीशी असणे महत्वाचे आहे. मनोजभाऊला अटक होत असेल तर महापुरूषांचा अपमान करणाऱ्या सर्व नेत्यांना अटक करा, अशी मागणी करून मोठे आंदोलन व्हायला हवे. कोश्यारी, चंद्रकांत पाटील असे अनेक आहेत. यांना पदमुक्त करा.

प्रांजल लांडगे.

सगळ्या उदारमतवादी आणि पुरोगामी लोकांनी जमेल त्या स्वरुपात मनोज गरबडे यंच्या पाठीशी खंबीर उभे रहावे. यात त्यांच्या परिवाराची हेळसांड होता कामा नये. जे आपल्याला प्रातिनिधिक स्वरुपात जमलं नाही, ते या मर्दाने करून दाखवलंय. अभिमान.

अश्वमेधा.

चंपाच्या तोंडाला काळे फासणाऱ्या पँथर मनोज गरबडे समता सैनिक दलातील, भीमसैनिकाला मानाचा क्रांतीकारी जयभीम. समता सैनिक दल, पुणे, इकडे लाड नसतोय… पुण्यातील वकील बांधवांनी सतर्क रहावे. आक्रमकपणे या वाघाच्या पाठी उभे रहावे.

विठ्ठल कदम यांनी शेअर केलेला समता सैनिक दलाचा व्हिडीओ.

पोलिसांनी नोंदवले हाफ मर्डरसह गंभीरस्वरुपाचे गुन्हे

एकीकडे मनोज गरबडे व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले आहेत. चंद्रकांत पाटलांवर शाई फेक केल्याप्रकरणी  मनोज भास्कर गरबडे (संघटक, समता सैनिक दल), धनंजय भाऊसाहेब इजगज ( सदस्य, समता सैनिक दल) आणि विजय धर्मा ओव्हळ ( सचिव, वंचित बहुजन आघाडी) या तिघांविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५५३/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३५३, २९४, ५००, ५०१, १२० (ब), ३४, फौजदारी कायदा (दुसरी सुधारणा) अधिनियमचे कलम ७ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

कलम ३०७ हे हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम आहे. त्यासाठी जास्तीत जास्त १० वर्षे कैद आणि दंडाची शिक्षा आहे. कलम ३५३ हे लोकसेवकाला त्याचे सरकारी कर्तव्य पार पाडताना त्याच्या कामात अडथळा आणल्याचे कलम आहे. यासाठी दोन वर्षे कैद आणि दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते. कलम २९४ हे सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे, दुर्व्यवहारपूर्ण वर्तन किंवा मानहानीकारक शब्द वापरण्यासाठी लावले जाते. यासाठी तीन महिने कैदेची शिक्षा व दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

 कलम ५०० हे एखाद्याच्या मानहानीसाठी लावले जाते. त्यासाठी दोन वर्षांपर्यंत कैद आणि दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते. कलम १२० (ब) सामूहिक कट रचून गुन्हा करण्यासाठी लावले जाते. यासाठी सहा महिने कैद व दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते. कमल ५०१ हे एखाद्याची जावीणपूर्वक मानहानी करण्यासाठी लावले जाते. या कलमाअंतर्गत दोन वर्षे कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते.

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरचे चहापान सरकारी कामात अडथळा कसा?:  ज्या ठिकाणी मनोज गरबडेने मंत्री चंद्रकांत पाटलावर शाई फेकली, ते ठिकाणी भाजपचे पदाधिकारी मनोज शेडगे यांचे निवासस्थान होते आणि चंद्रकांत पाटील हे त्या ठिकाणी चहापान घेण्यासाठी गेले होते. तरीही पिंपरी चिंचवड पोलिसांनी मनोज गरबडे व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे भाजप पदाधिकाऱ्याच्या खासगी निवासस्थानी खासगी कामासाठी गेलेले असतानाही सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कसा? चंद्रकांत पाटलांचे चहापानही सरकारी काम कसे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!