तिढा सुटलाः राज्यातील १२ जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री, अजित पवारांनी हिसकावले चंद्रकांत पाटलांकडून पुण्याचे पालकमंत्रिपद!


मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची सुधारित यादी बुधवारी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. यापूर्वी पुण्याचे पालकमंत्रिपद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडे होते.

पालमंत्र्यांच्या सुधारित यादीत अजित पवार गटाच्या सात मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळाले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे तर हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नाशिक, सातारा आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे.

पालकमंत्रिपदाची सुधारित जबाबदारी अशी

पुणे: अजित पवार

अकोला: राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर: चंद्रकांत दादा पाटील

अमरावती: चंद्रकांत दादा पाटील

भंडारा: डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा: दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर: हसन मुश्रीफ

गोंदिया: धर्मरावबाबा आत्राम

बीड: धनंजय मुंडे

परभणी: संजय बनसोडे

नंदूरबार: अनिल पाटील

वर्धा: सुधीर मुनगंटीवार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *