२० जानेवारीपासून तीन दिवस एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा, छत्रपती संभाजीनगरात दोन परीक्षा केंद्रावर ५२८ उमेदवारांची व्यवस्था


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवर, २०, रविवार, २१ व सोमवार, २२ जानेवारी रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन परीक्षा केंद्रांवर ५२८ उमेदवारांची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या कामकाजासाठी ७३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद)  नागसेन वनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात २४० परीक्षार्थी आणि सुभेदारी विश्रामगृहाजवळील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात २८८ परीक्षार्थींच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.

डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे, असेही उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!