जुलैचा पहिला आठवडा पावसाचाः ८ तारखेपर्यंत ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार तर ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज!


मुंबईः मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असतानाच हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक वेधशाळेकडून येत्या ८ जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील चार दिवस काही जिल्ह्यांत अतिमुसळधार तर काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

४ जुलैः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नंदूरबार, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

५ जुलैः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पालघर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

६ जुलैः पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

७ जुलैः पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती,  बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

८ जुलैः पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर,कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!