महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी सुट्टी, मतदानासाठी उद्योग विभागाचा निर्णय


मुंबई: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह,  महामंडळे,  कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!