विधानसभा निवडणूकः कोणी घेतली माघार?, कोण निवडणुकीच्या रिंगणात?; वाचा संभाजीनगर जिल्ह्यातील चित्र एका क्लिकवर


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. विधानसभेच्या २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कुठे आणि किती उमेदवार?

औरंगाबाद पूर्व

वैध उमेदवारी अर्जः ६९, माघारी घेतलेले अर्जः ४०, रिंगणातले उमेदवारः२९

अंतिम उमेदवार असेः अतुल सावे (भाजप),लहु शेवाळे (काँग्रेस),शितल बन्सोडे (बसप),अफसर खान (वंचित बहुजन आघाडी),अब्दुल गफ्फार कादरी (सप),इम्तियाज जलील (एमआयएम),इसा यासीन (एआयएमईएम),जयप्रकाश घोरपडे (शेकाप),योगेश सुरडकर (लोकराज्य पार्टी), रविकिरण पगारे (व्हीसीके), राहुल साबळे (आजाद पार्टी), साहेब खान यासीन खान (बीआरएसपी),झाकिरा उर्फ शकीला नाजेखान पठाण (अपक्ष),तसनीम बानो (अपक्ष), दैवशाली झिने (अपक्ष),नीता भालेराव (अपक्ष),पाशु शेखलाल शेख (अपक्ष), मधुकर त्रिभुवन (अपक्ष), मोहम्मद मोहसीन (अपक्ष), राहुल निकम (अपक्ष), लतीफ खान (अपक्ष), शहजाद खान (अपक्ष), शमीम मोहम्मद शेख (अपक्ष), शेख गुफरान (अपक्ष),सद्दाम अब्दुल (अपक्ष), सलीम पटेल(अपक्ष), सोमनाथ वीर (अपक्ष), संतोष साळवे (अपक्ष), हनिफ शाह (अपक्ष).

औरंगाबाद पश्चिम

वैध उमेदवारी अर्जः २८, माघारी घेतलेले अर्जः १०, रिंगणातले उमेदवारः १८

अंतिम उमेदवार असेः कुणाल लांडगे(बसप), राजू शिंदे (शिवसेना-उबाठा), संजय शिरसाठ (शिवसेना), अनिल धुपे (एचजेपी), अरविंद कांबळे (बीआरएसपी), अंजन साळवे (वंचित बहुजन आघाडी), कैलास सोनोने (पीपीआय-डी), पंचशीला जाधव (रिबसे),  मुकुंद गाडे (एसबीकेपी), रमेश गायकवाड (आरपीआय-डी), संजीवकुमार इखारे (आरपीआय-खोरिप), संदीप सिरसाट (मस्वपा), अनिल जाधव (अपक्ष), जगन साळवे (अपक्ष), निखिल मगरे (अपक्ष), मधुकर त्रिभुवन (अपक्ष), मनीषा खरात (अपक्ष), सुलोचना आक्षे (अपक्ष).

औरंगाबाद मध्य

वैध उमेदवारी अर्जः ३५, माघार घेतलेले उमेदवारः ११ रिंगणातले उमेदवारः २४

अंतिम उमेदवार असेः प्रदीप जैस्वाल( शिवसेना), सुहास दाशरथे (मनसे), डॉ. बाळासाहेब थोरात (शिवसेना-उबाठा), विष्णू वाघमारे (बसप), मो. जावेद मो. इसाक (वंचित बहुजन आघाडी), नदीम राणा (एआयएमईएम), नवाब शेख (बीआरएसपी), डॉ. प्रमोद दुथडे (प्रहार), बबनगीर गोसावी (एसजेपी), मुजम्मिल खान (एसडीपीआय), सचिन निकम (रिपब्लिन सेना), सिद्दिकी नसीरोद्दीन (एआयएमआयएम), सुनिल अवचरमल (आरपीआय-आर), सुरेंद्र गजभारे (एमएमएम), संदीप जाधव (पीपीआय-डी), अब्बास मैदू (अपक्ष), कांचन जंबोटी (अपक्ष), जयवंत ओक (अपक्ष), मोहम्मद युसूफ (अपक्ष), मंगेश कुमावत (अपक्ष), महंत विजय आचार्य (अपक्ष), शकील इब्राहीम (अपक्ष), सुरेश गायकवाड (अपक्ष),  हिशाम उस्मानी (अपक्ष).

गंगापूरमध्ये तीन सतीश चव्हाण

वैध उमेदवारी अर्जः ४५, माघार घेतलेले उमेदवारः २७, रिंगणातले उमेदवारः १८

अंतिम उमेदवार असेः प्रशांत बंब (भाजप), सतीश चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार),  सतीश तेजराव चव्हाण, भारत फुलारे, बाबासाहेब गायकवाड, अनिता वैद्य, बाबासाहेब लगड, शिवाजी ठुबे, गोरख इंगळे, सतीश हिरालाल चव्हाण, देविदास कसबे, संजय तायडे, अविनाश गायकवाड, सुरेश सोनवणे, किशोर पवार, राजेंद्र मंजुळे, पुष्पा जाधव.

सिल्लोडमध्यो दोन सुरेश बनकर

वैध उमेदवारी अर्जः ३५, माघार घेतलेले उमेदवारः ११, रिंगणातले उमेदवारः २४

अंतिम उमेदवार असेः अब्दुल सत्तार (शिवसेना), सुरेश बनकर (शिवसेना-उबाठा), संघपाल सोनवणे (बसप), बनेखा पठाण (वंचित बहुजन आघाडी), राजू तडवी (बीटीपी), शेख उस्मान (एआयएफबी), अनिल राठोड (अपक्ष), अफसर तडवी (अपक्ष), अरूण चव्हाण (अपक्ष), अशोक सोनवणे (अपक्ष), श्रीराम आळणे (अपक्ष), राजू गवळी (अपक्ष), परीक्षित भरगाडे (अपक्ष), सुरेश पांडुरंग बनकर (अपक्ष), भास्कर सरोदे (अपक्ष), रफिक खान (अपक्ष), राजू साठे (अपक्ष), राहुल राठोड (अपक्ष), विकास नरवाडे (अपक्ष), शदर तिगोटे (अपक्ष),शेख मुख्तार (अपक्ष), श्रावण शिनकर (अपक्ष), सचिन हावळे (अपक्ष), संदीप सुरडकर(अपक्ष).

पैठण

वैध उमेदवारी अर्जः ५१, माघार घेतलेले उमेदवारः ३४, रिंगणातले उमेदवारः १७

अंतिम उमेदवार असेः दत्तात्रय गोरडे (शिवसेना-उबाठा), विलास भुमरे (शिवसेना), विजय बचके (बसप), अरूण घोडके (वंचित बहुजन आघाडी),  आरेफ बनेमियाँ (एआयएमईएम), इमराम नजीर (एसडीपीआय), कैलास तवार (स्वाभिमानी पक्ष), गोरख शणागत (बीबीपी), प्रकाश दिलवाले ( आरएसपी), महेबुब अजीज (जनहित पार्टी), अजहर बापुलाल (अपक्ष), कुणाल वाव्हळ (अपक्ष), कृष्णा गिरगे (अपक्ष), जियाउद्दीन अकबर (अपक्ष), रियाज शेख (अपक्ष), वामन साठे (अपक्ष), संतोष राठोड (अपक्ष).

फुलंब्री

वैध उमेदवारी अर्जः ६५, माघार घेतलेले उमेदवारः ३८, रिंगणातले उमेदवारः २७

अंतिम उमेदवार असेः अनुराधा चव्हाण (भाजप), अमोल पवार (बसप), विलास औताडे (काँग्रेस), बाळासाहेब पाथ्रीकर (मनसे), डॉ. कैलाशचंद्र बनसोडे (विदुथलाई), चंद्रकांत रुपेकर (रिपब्लिकन सेना), दिनकर खरात (आझाद पार्टी), महेश निनाळे (वंचित बहुजन आघाडी), रमेश काटकर (आरएसपी), राजेश वानखेडे (एआयएफबी), सुनिल साळवे (पीपीआय-डी), अनिस खान (अपक्ष), अब्दुल रहीम (अपक्ष), अंजली साबळे (अपक्ष), मारोती कांबळे (अपक्ष), जगन्नाथ काळे (अपक्ष), तौफिक रफीक (अपक्ष), नयुम दाऊत (अपक्ष), मंगेश साबळे (अपक्ष), रमेश पवार (अपक्ष), राहुल भोसले (अपक्ष), लक्ष्मण गिरी (अपक्ष), लक्ष्मण कांबळे (अपक्ष), विशाल पाखरे (अपक्ष), सय्यद हारून (अपक्ष), सलीम शाह भिकन शाह (अपक्ष), संजय चव्हाण (अपक्ष).

कन्नडः नवऱ्याच्या विरोधात बायको मैदानात

वैध उमेदवारी अर्जः ४३, माघार घेतलेले उमेदवारः २७, रिंगणातले उमेदवारः १६

अंतिम उमेदवारः उदयसिंग राजपूत (शिवसेना-उबाठा), लखन चव्हाण (मनसे), रंजना जाधव (बसप), रंजनाताई हर्षवर्धन जाधव (शिवसेना), अयास मकबुल शाह (वंचित बहुजन आघाडी), डॉ. विकासराजे बरबंडे (एचजेपी), हय्यास मोईनोद्दीन (जनहित पार्टी), हर्षवर्धन जाधव (अपक्ष), अ. जावेद (अपक्ष), मनीषा राठोड (अपक्ष), मनोज पवार (अपक्ष), युवरास बोरसे (अपक्ष), विठ्ठल थोरात (अपक्ष), वैभव भंडारे (अपक्ष), सईद अहमद (अपक्ष), संगीता जाधव (अपक्ष).

वैजापूरः भाऊच भावाच्या विरोधात

वैध उमेदवारी अर्जः २६, माघार घेतलेले उमेदवारः १६, रिंगणातले उमेदवारः १०

अंतिम उमेदवार असेः दिनेशसिंग परदेशी (शिवसेना-उबाठा), रमेश बोरनारे (शिवसेना), संतोष पठारे (बसप), किशोर जेजूरकर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. जगन्नाथ खंडेराव जाधव (प्रहार), विजय शिनगारे (बीआरएसपी), एकनाथ खंडेराव जाधव (अपक्ष), प्रकाश पारखे (अपक्ष), शिवाजी गायकवाड (अपक्ष), ज्ञानेश्वर घोडके (अपक्ष).

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!