काँग्रेसची ४८ आणि काकांच्या राष्ट्रवादीची ४५ उमेदवारांची पहिली आणि वंचितचीही यादी जाहीर, बारामतीत दादांची ‘सुनेत्रा’ करण्यासाठी युगेंद्र!


मुंबईः महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याचा फैसला होणे बाकी असतानाच आज काँग्रेसने ४८ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनेही आज सहावी उमेदवार यादी जाहीर केली. बारामतीत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत केले आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्याही जागा लवकरच जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष २७५ जागा लढवणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पहिली यादी जाहीर करताना दिली.

राष्ट्रवादीचे ४५ उमेदवार असे

  • इस्लामपूर: जयंत पाटील
  • काटोल: अनिल देशमुख
  • घनसावंगी: राजेश टोपे
  • कराड उत्तर: बाळासाहेब पाटील
  • मुंब्रा कळवा: जितेंद्र आव्हाड
  • कोरेगाव: शशीकांत शिंदे
  • वसमत: जयप्रकाश दांडेगावकर
  • जळगाव ग्रामीण: गुलाबराव देवकर
  • इंदापूर: हर्षवर्धन पाटील
  • राहुरी: प्राजक्त तनपुरे
  • शिरूर: अशोक पवार
  • शिराळा: मानसिंग नाईक
  • विक्रमगड: सुनिल भुसारा
  • कर्जत जामखेड: रोहित पवार
  • अहमदपूर: विनायकराव पाटील
  • सिंदखेडराजा: डॉ. राजेंद्र शिंगणे
  • उदगीर: सुधाकर भालेराव
  • भोकरदन: चंद्रकांत दानवे
  • तुमसर: चरण वाघमारे
  • किनवट: प्रदीप नाईक
  • जिंतूरः विजय भांबळे
  • केज: पृथ्वीराज साठे
  • बेलापूरः संदीप नाईक
  • वडगाव शेरीः बापूसाहेब पठारे
  • जामनेर: दिलीप खोपडे
  • मुक्ताईनगर: रोहिणी खडसे
  • मूर्तिजापूर: सम्राट डोंगरदिवे
  • नागपूर पूर्व: दुनेश्वर पेठे
  • तिरोडा: रविकांत बोपचे
  • अहेरीः भाग्यश्री आत्राम
  • बदनापूरः रुपकुमार (बब्लू) चौधरी
  • मुरबाडः सुभाष पवार
  • घाटकोपर पूर्वः राखी जाधव
  • आंबेगावः देवदत्त निकम
  • बारामतीः युगेंद्र पवार
  • हडपसरः प्रशांत जगताप
  • कोपरगावः संदीप वर्षे
  • शेवगावः प्रताप ढाकणे
  • पारनेरः राणी लंके
  • आष्टीः मेहबूब शेख
  • करमाळाः नारायण पाटील
  • सोलापूर शहर उत्तरः महेश कोठे
  • चिपळूणः प्रशांत यादव
  • कागलः समरजित घाटगे
  • तासगाव कवठे-महाकाळः रोहित आर.आर. पाटील

काँग्रेसचे उमेदवार

  • अक्कलकुवाः के.सी. पडवी
  • शहादाः राजेंद्रकुमार गावीत
  • नंदूरबारः किरण तडवी
  • नवापूरः श्रीकृष्णकुमार नाईक
  • साक्रीः प्रवीण चौरे
  • धुळे ग्रामीणः कुणाल पाटील
  • रावेरः धनंजय चौधरी
  • मलकापूरः राजेश एकाडे
  • चिखलीः राहूल बोंद्रे
  • रिसोडः अमीत झनक
  • धामणगाव रेल्वेः प्रा. विरेंद्र जगताप
  • अमरावतीः डॉ. सुनिल देशमुख
  • तिवसाः ऍड. यशोमती ठाकूर
  • अचलपूरः अनिरूद्ध देशमुख
  • देवळीः रणजित कांबळे
  • नागपूर दक्षिण पश्चिमः प्रफुल्ल गुडधे
  • नागपूर मध्यः बंटी शेळके
  • नागपूर पश्चिमः विकास ठाकरे
  • नागपूर उत्तरः डॉ. नितीन राऊत
  • साकोलीः नानाभाऊ पटोले
  • गोंदियाः गोपालदास अग्रवाल
  • राजुराः सुभाष धोटे
  • ब्रह्मपुरीः विजय वडेट्टीवार
  • चिमूरः सतीश वारजूकर
  • हदगावः माधवराव पवार पाटील
  • भोकरः तिरूपती कोंडेकर
  • नायगावः मिनल पाटील
  • पाथ्रीः सुरेश वरपूडकर
  • फुलंब्रीः विलास औताडे
  • मीरा भायंदरः सय्यद मुझफ्फर हुसैन
  • मालाड पश्चिमः अस्लम शेख
  • चांदीवलीः मोहम्मद अरीफ नसीम खान
  • धारावीः डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
  • मुंबादेवीः अमीन पटेल
  • पुरंदरः संजय जगताप
  • भोरः संग्राम थोपटे
  • कसबा पेठः रविंद्र धंगेकर
  • संगनेरः विद. बाळासाहेब थोरात
  • शिर्डीः प्रभावती घोगरे
  • लातूर ग्रामीणः धीरज देशमुख
  • लातूर शहरः अमित देशमुख
  • अक्कलकोटः सिद्धराम मेहत्रे
  • कराड दक्षिणः पृथ्वीराज चव्हाण
  • कोल्हापूर दक्षिणः ऋतुराज पाटील
  • करवीरः राहुल पाटील
  • हातकणगलेः राजू आवळे
  • पलूस-कडेगावः डॉ. विश्वजीत कदम
  • जतः विक्रमसिंह सावंत

‘वंचित’चे ४५ उमेदवार

  • जळगाव शहरः ललितकुमार रामकिशोर घोगले
  • मुक्ताईनगरः संजय ब्राम्हणे
  • बुलढाणाः सदानंद माळी
  • अकोला पूर्वः  ज्ञानेश्वर सुलता
  • मेळघाटः  संदीप कणीराम तोटे
  • अचलपूरः प्रदीप साहेबराव मानकर
  • मोर्शी वरुडः सौरभ श्रीरामजी मानकर
  • आर्वीः मारुती गुलाबराव उईके
  • काटोलः विवेक रामचंद्र गायकवाड
  • हिंगणाः अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे
  • नागपूर पूर्वः गणेश ईश्वरजी हरकांडे
  • नागपूर पश्चिमः यश सुधाकर गौरखेड
  • भंडाराः अरुण जाधोजी गोंडाने
  • आरमोरीः मोहन गणपत पुराम
  • राजुराः महेंद्रसिंह बबनसिंह चंदेल
  • यवतमाळः डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे
  • दिग्रसः नाजुकराव धांदे
  • नायगावः डॉ. महादेव विभूते
  • जिंतूरः सुरेश पुंडलिक नागरे
  • गंगाखेडः सीताराम घनदाट
  • पाथरीः सुरेश फड
  • मालेगाव बाह्यः किरण नाना मगरे
  • कळवणः दौलत राम राऊत
  • चांदवडः दिगंबर शांताराम जाधव
  • येवलाः नामदेव संपत पवार
  • नाशिक पूर्वः रविंद्रकुमार जनार्दन पगारे
  • शहापूरः सचिन कुनबे
  • कालिनाः मोहम्मद लुकमान सिद्धीकी
  • जून्नरः देवराम लांडे
  • खेड-आळंदीः रविंद्र रंधवे
  • शिरूरः रामकृष्ण रखमाजी बीडगर
  • वडगाव शेरीः विवेक कृष्णा लोंढे
  • पर्वतीः सुरेखा मगरध्वज गायकवाड
  • पुणे कॅन्टोन्मेंटः निलेश सुरेश आल्हाट
  • करमाळाः अतुल भैरवनाथ खुपसे
  • बार्शीः धनंजय आनंदराव जगदाळे
  • सोलापूर दक्षिणः संतोष सेवू पवार
  • फलटणः सचिन जालंदर भिसे
  • वाईः अनिल मारुती लोहार
  • पाटणः बाळासो रामचंद्र जगताप
  • कोल्हापुर दक्षिणः अब्दुल हमीद शहाजान मिरशिकारी
  • हातकणंगलेः डॉ. क्रांती दिलीप सावंत
  • इस्लामपूरः राजेश शिवाजी गायगवाळे
  • पळसू-कडेगावः जिवन किसन करकटे
  • जतः विठ्ठल दुंडाप्पा पुजारी

या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत

  • कागलः समरजितसिंह घाटगे (काका गट) विरुद्ध हसन मुश्रीफ (दादा गट)
  • बारामतीः युगेंद्र पवार (काका गट) विरूद्ध अजित पवार (स्वतः दादा गट)
  • इंदापूरः हर्षवर्धन पाटील (काका गट) विरुद्ध दत्तात्रय भरणे (दादा गट)
  • उदगीरः सुधाकर भालेराव (काका गट) विरूद्ध संजय बनसोडे (दादा गट)
  • कोपरगावः संदीप वर्षे (काका गट)  विरुद्ध आशुतोष काळे (दादा गट)
  • हडपसरः प्रशांत जगताप (काका गट) विरूद्ध चेतन तुपे (दादा गट)
  • तुमसरः चरण वाघमारे (काका गट) विरुद्ध राजू कोरमारे (दादा गट)
  • कळवा मुंब्राः जितेंद्र आव्हाड (काका गट) विरुद्ध नजीब मुल्ला (दादा गट)
  • अहेरीः भाग्यश्री आत्राम (काका गट) विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम (दादा गट)

२८८ मतदारसंघासाठी ५५२ उमेदवारी अर्ज

विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!