सॅन डिएगोः पृथ्वीचा आतील गाभा २०१० पासून म्हणजेच २४ वर्षांपासून हळूहळू फिरू लागला आहे. त्यामुळशे दिवसाची लांबी एका सेकंदाच्या अंशाने बदलू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पृथ्वी सूर्याभोवती सतत फिरत असते. सूर्याभोवती फिरतानाच पृथ्वी आपल्या अक्षावरही फिरत असते. पृथ्वी अक्षावर फिरल्यामुळे दिवस आणि रात्र होते. तर सूर्याच्या परिभ्रमणामुळे ऋतूंमध्ये बदल होतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनात कोर म्हणून ओळखला जाणारा पृथ्वीचा सर्वात आतला थर पूर्वीपेक्षा हळू फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पृथ्वीच्या कोरमध्ये दोन भाग असतात. त्यापैकी एक आतील गाभा तर दुसरा बाह्य कोर असतो. पृथ्वीचा हाच सर्वात आतील गाभा गेल्या २४ वर्षांपासून म्हणजेच २०१० पासून पूर्वीपेक्षा हळूहळू फिरत आहे. पृथ्वीच्या आतील गाभ्याची फिरण्याची गती मंदावल्यामुळे दिवसाची लांबी एक सेकंदाच्या अंशाने बदलू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
पृथ्वी नेहमी एकाच वेगाने फिरत नाही, असे काही शास्त्रज्ञ मानतात. सिस्मोग्राम लहरींच्या माध्यमातून संशोधक पृथ्वीच्या आतल्या थरांचा अभ्यास करतात. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातील संशोधकांनी हे अध्ययन केले आहे. २०१० नंतर पृथ्वीचा आतील गाभा मागील दशकाच्या तुलनेत मंद होत आहे किंवा मागे पडत आहे. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वेगाच्या तुलनेतही मंद गतीने फिरत आहे, असे यूनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जेव्हा सिस्मोग्राम तरंग पाहिले तेव्हा अनेक दशकांनंतर पृथ्वीच्या आतील गाभ्याची वेग कमी झाल्याचे निदर्शनास आले, असे या संशोधनाशी संबंधित असलेले प्रा. जॉन विडले यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पृथ्वीच्या आतील गाभ्याचा वेग मंदावला असल्याचेही विडेल यांनी म्हटले आहे.
पृथ्वीच्या द्रव कोरचा वेग देखील पृथ्वीच्या वेगापेक्षा कमी होता. हा प्रभाव कमी करण्यासाठी पृथ्वीचा घन भाग अधिक वेगाने फिरू लागला. परिणामी १९७२ पासून काही वर्षांनी यूटीसी वेळेत एक लीप सेकंद जोडण्याची गरज आहे, असे सॅन डिएगो विद्यापीठातील संशोधक डंकन एग्न्यू यांनी म्हटले आहे. यूटीसी वेळेत एक लीप सेकंद जोडला गेल्यास तुमच्या घड्याळातही तसे बदल करावे लागणार आहेत.