दहावी, बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


मुंबई फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी, शर्तीनुसार नाव नोंदणी करण्याकरता उपलब्ध आहेत.

इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेला बसण्याबाबतची सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थी/शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!