महत्वाची बातमीः दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आधार कार्ड लगेच अपडेट करा, केंद्र सरकारने नियम बदलले!

नवी दिल्लीः केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमांत सुधारणा केल्या आहेत. आता नागरिकांना दर दहा वर्षांनी कमीत कमी एकदा आधारमधील आपले सहायक दस्तावेजांना अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड काढून जर दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर तुमचे आधार लगेचच अपडेट करून घ्या.

आधार क्रमांक धारक, आधारसाठी नामांकनाच्या तारखेपासून दर दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधारमधील तुमचे सहायक दस्तावेज कमीत कमी एकवेळा ओळखीचे प्रमाणिकरण आणि पत्त्याचे प्रमाणिकरण दस्तावेज जमा कडून अपडेट करू शकतात, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) म्हटले आहे. यूआयडीएआयने ही घोषणा मागच्याच महिन्यात केली होती, मात्र आधार अपडेट करणे अनिवार्य केले नव्हते. मात्र आता ९ नव्हेंबरपासून आधार अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

ज्यावेळी आधार कार्ड तयार करण्यात येत होते, त्यावेळी बऱ्याच लोकांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली नव्हती. यूआयडीएआयने यावर कोणताही आक्षेप न घेताच आधार कार्ड जारी केले होते. परंतु आता आधार अपडेट करताना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. बऱ्याच लोकांचे पत्ते आणि मोबाइल नंबर बदललेले आहेत. आता त्यांना ते अपडेट करता येऊ शकतील. कोणत्याही आधार सेंटरवर जाऊन आधार अपडेट करता येईल. आधार सेंटरवर अपडेटचे कामही सुरू झाले आहे.

ही कागदपत्रे सोबत न्याः  तुम्ही जर आधार अपडेट करण्यासाठी जात असाल तर एक असे सरकारी ओळखपत्र तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे, ज्यावर तुमचा विद्यमान पत्ता आणि तुमचे छायाचित्र असेल. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असेल तर ते सोबत नेणे उत्तम. केंद्र सरकारने आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क निश्चित केले आहे.

स्वतःच ऑनलाइनही अपडेट करता येईल आधारः

  • जर तुम्ही तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करू इच्छित असाल तर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर अपडेट यूवर ऍड्रेस ऑनलाइन हा पर्या निवडा, जर तुमच्याकडे सरकारी ऍड्रेस प्रुफ असेल तर पत्ता अपडेट करा.
  • त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर नवीन पेज येईल. त्यावर तुमचा १२ आकडी आधार क्रमांक टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा. तुमच्या आधारशी जो मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असेल त्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर अपडेट ऍड्रेस बाय ऍड्रेस प्रुफ किंवा अपडेट ऍड्रेस विथ सिक्रेट कोड यापैकी एक पर्याय निवडा.
  • तिसऱ्या टप्प्यावर ऍड्रेस प्रुफमध्ये दिलेला पत्ता टाका. नंतर प्रीव्ह्यू पहा. जर तुम्हाला तुमच्या पत्यात दुरूस्ती करायची असेल तर मॉडिफायवर क्लिक करा त्यानंतर डिक्लेरेशनवर टिक करून सबमीट बटन दाबा.
  • चौथ्या टप्प्यावर तुम्हाला तो दस्तावेज निवडावा लागेल, जो तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी टाकत आहात. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस प्रुफची कॉपी अपलोड करून सबमीट बटन दाबावे लागेल. तुमची आधार अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि तुम्हाला १४ आकडी यूआरएन दिला जाईल. त्याच्या आधारे तुम्ही आधार अपडेटचे स्टेटस चेक करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!