राज्यात चार नवीन कृषी संचालयनालयांची निर्मिती, कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधानुसार २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी
मुंबईः बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तब्बल १७ वर्षांनंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २ हजार ६६ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. काळानुसार कृषी विभागाच्या गरजा आणि मागणी लक्षात घेऊन चार नव्या कृषी संचालयनालयांच्या निर्मितीसही मंजुरी देण्यात आली आहे.
नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागातील २३ हजार ४७६ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २ हजार ६६८ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. कालबाह्य झालेली काही पदे रद्द करून आणि काही पदांमध्ये कपात करून हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून त्यामुळे दरवर्षी सुमारे ९२.६० कोटी रुपयांची बचत होणार आह...








