‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरूद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनेक कारनाम्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान यांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला मिळवल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून आता या दोघांचेही पीेएच.डी. चे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी दिली. २२ मार्च रोजी न्यूजटाऊनने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.
कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी विषयातील बन...