‘राज्यात भाजप व्हेंटिलेटरवर, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आणले’!
मुंबईः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी ९० हजार बुथवर भाजपने गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आणले, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना केले. त्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपवर टिकास्त्र सोडले असून महाराष्ट्रात भाजप कमकुवत असून व्हेंटिलेटरवर आहे, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी १६ नोव्हेंबर रोजी पाथर्डी येथील प्रचारसभेत बोलताना भाजपचे निवडणुकीचे नियोजन कसे असते, हे सांगताना महाराष्ट्रातील ९० हजार बुथवर गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आले आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यामुळे त्यापेक्षाही जास्त लोक बाहेरून आले आहेत, असे वक्तव्य केले आहे.
पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्याच...