प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ कवितासंग्रह प्रकाशित; गज्वींची प्रस्तावना, ‘उपरा’कारांचा ब्लर्ब!
यवतमाळः आंबेडकरी कवि प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ हा पहिला कवितासंग्रह नोशनप्रेस या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रसिद्ध विचारवंत, नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे.
कवि प्रा. संदेश ढोले यांच्या ‘एवढेच फक्त सांगता येते’ या कवितासंग्रहातील कवितांवर प्रसिद्ध समीक्षक जयंत साठे यांनी वैचारिक भाष्य केले आहे. तर पद्मश्री ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी कवितासंग्रहाचे ब्लर्ब लिहिले आहेत. हा कवितासंग्रह लवकरच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.
प्रा. संदेश ढोले यांच्या कवितेवर ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिहितात...
धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. डॉ...