महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.
ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या.
महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...