महाराष्ट्र

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही: उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही: उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर: नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. नार-पार-औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करुन पूर्वेकडील अति तूटीच्या गिरणा उपखो-यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यातील ...
बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार, उदगीर तालुक्यात चार जणांवर कारवाई
महाराष्ट्र

बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार, उदगीर तालुक्यात चार जणांवर कारवाई

नागपूर: राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. उदगीर तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यातत आल्याचेही ते म्हणाले. आमदार संजय बनसोडे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना महाजन यांनी ही माहिती दिली. बोगस डॉक्टर शोधण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरीय समिती आहेत. त्या समिती सदस्यांना नियमित बैठका घेऊन त्यांना कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे महाजन म्हणाले.  सध्याच्या कायद्यानुसार या प्रकरणात सापडलेले बोगस डॉक्टर कायद्यातील तरतुदीचा लाभ घेऊन सुटतात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना कडक शिक्षा देण्याबाबत का...
औरंगाबाद मनपाचे ‘डॉन’ शहर अभियंता पानझडेंचे ‘दिवस’ फिरले,  प्रधान सचिवांमार्फत चौकशीची विधानसभेत घोषणा
महाराष्ट्र

औरंगाबाद मनपाचे ‘डॉन’ शहर अभियंता पानझडेंचे ‘दिवस’ फिरले, प्रधान सचिवांमार्फत चौकशीची विधानसभेत घोषणा

नागपूर: औरंगाबाद महानगरपालिकेचे ‘डॉन’ अशी ख्याती असलेले शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे फासे आता उलटे फिरल्याचे आज स्पष्ट झाले. पानझडे यांनी केलेल्या सर्वच भानगडींची प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्याची घोषणा आज उद्योग मंत्री उद्य सामंत यांनी विधानसभेत केली. सखाराम पानझडे यांनी स्थापत्य पदविका आधारे नोकरीवरून शासकीय नियमांचे उल्लंघन करत पदोन्नती मिळून शहर अभियंतापर्यंत पदोन्नती मिळवली. पदवीधर अभियंताला डाउनलोड स्थापत्य पदविकाधारक असलेल्या सखाराम धोंडीबा पानझडे यांना पदोन्नती देणे, तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर गैरमार्गाने करार पद्धतीवर स्वतःची नेमणूक करून घेणे, शासन निर्णय अंमलबजावणी करण्याऐवजी उल्लंघन करणे, याबाबत प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली या समितीवर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत सखोल चौकशी ...
हिवाळी अधिवेशनः जयंत पाटलांच्या निलंबनामुळे विधानसभेच्या कामकाजावर महाविकास आघाडीचा बहिष्कार!
महाराष्ट्र, राजकारण

हिवाळी अधिवेशनः जयंत पाटलांच्या निलंबनामुळे विधानसभेच्या कामकाजावर महाविकास आघाडीचा बहिष्कार!

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशन संपेर्यंत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला असून जयंत पाटलांचे निलंबन मागे घेतले जाईपर्यंत विधानसभेच्या कामजावर बहिष्कार टाकला आहे. विधान परिषदेच्या कामकाजात मात्र विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार आहेत.  जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आम्ही सभात्याग केला होता. आजही आमची तिच भूमिका राहणार आहे. जयंत पाटील यांचे वागणे, बोलणे, स्वभाव हे गेल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात बसू दिले पाहिजे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ही मागणी मान्य होत नसल्यामुळे आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.  दरम्यान, या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या ...
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर चालवली बिल्डरची गाडी, काँग्रेसने केला खळबळजनक आरोप
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावर चालवली बिल्डरची गाडी, काँग्रेसने केला खळबळजनक आरोप

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावरून प्रवास करत या महामार्गाचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवली तर त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर ते शिर्डी या टेस्ट ड्राइव्हसाठी फडणवीस-शिंदेंनी वापरलेली गाडीच आता वादाचा विषय ठरली आहे. ही गाडी एका बिल्डराच्या मालकीची असून त्यावरून काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता राज्य चालवायला बिल्डरांच्या हातात देणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे. फडणवीस आणि शिंदे यांचा टेस्ट ड्राइव्ह नागपूरहून सुरू झाला, तो शिर्डीत संपला. या टेस्ट ड्राइव्हसाठी शिंदे- फडणवीसांनी मर्सिडीज बेन्झ एजी, जी ३५० डी ही अलिशान गाडी वापरली. एमएच ४९ बीआर ०००७ क्रमांकाची ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या मालकीची असल्याची कागदपत्रेच महाराष्ट्र प्रदेश काँ...
सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार: मुख्यमंत्री
महाराष्ट्र

सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार: मुख्यमंत्री

मुंबई: सोयाबीन-कापूस पिकाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भातील धोरणात बदल करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या शेतकरी शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेतले. कापूस उत्पादकांच्या केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरूवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहकार विभागाच...
मुंडेंच्या बालेकिल्ल्यावर फडणवीसांचा डोळा; पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार?  ठाकरे गटाकडून पक्षप्रवेशाची खुलीऑफर!
महाराष्ट्र, राजकारण

मुंडेंच्या बालेकिल्ल्यावर फडणवीसांचा डोळा; पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार?  ठाकरे गटाकडून पक्षप्रवेशाची खुलीऑफर!

औरंगाबादः भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी (१५ जानेवारी) गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली असतानाच शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंकजा मुंडेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. मुंडेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचा हा पंधरा दिवसातील दुसरा दौरा आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही ऑफर दिली आहे. ठाकरे गटाच्या या ऑफरनंतर पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद...
औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करणार: कृषीमंत्री अब्दुल सत्तार
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करणार: कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर: महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत केली. आमदार सतीश चव्हाण यांनी महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना सत्तार बोलत होते. राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत, असे सत्तार म्हणाले. महिलांच्या कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये खास बाब म्हणून पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल. यासोबतच औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही अब्दुल सत्तार यांनी सभागृहात स्पष्ट केले....
शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर आलेल्या फोनमुळे खळबळ
महाराष्ट्र, विशेष

शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर आलेल्या फोनमुळे खळबळ

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी दिली असून सिल्व्हर ओक निवास्थानावरील टेलिफोन ऑपरेटरच्या फिर्यादीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारीच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आज त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञान व्यक्तीने सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवास्थानी फोन केला आणि हिंदी भाषेतून ‘शरद पवारांना देशी कट्ट्याने ठार मारू,’ अशी धमकी दिली आहे. सिल्व्हर ओक निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने याबाबत गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा ...
चंद्रकांत पाटलांवर शाई फेकून केले तोंड काळे, पिंपरी चिंचवडमधील घटना; पहा व्हिडीओ
महाराष्ट्र, विशेष

चंद्रकांत पाटलांवर शाई फेकून केले तोंड काळे, पिंपरी चिंचवडमधील घटना; पहा व्हिडीओ

पुणेः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकून एका व्यक्तीने त्यांचे तोंड काळे केले. आज पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत ही शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठाच्या कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याच्या सर्वस्तरातून निषेध केला जात असून आज पुण्यासह विविध ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली आहेत. औरंगाबाद दौरा आटोपून चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात दाखल झाले. ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!