औरंगाबादेत गोवरचा एक वर्षाचा बालक गोवर पॉझिटिव्ह, तिघांचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या हाफकीनमध्ये
औरंगाबादः मुंबई, भिवंडी, पुणे पाठोपाठ शहरात गोवर साथीचा प्रादुर्भाव वाढण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या भानुदासनगरमधील एक वर्षाच्या बालकाचा गोवरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तीन बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
मुंबई आणि भिवंडी येथे गोवरची साथ उदभवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून काही दिवसांपासून खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिकेने संशयित २५ गोवर रुग्णांच्या रक्तांचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबई येथील हाफकीन लॅबोरेटरीत पाठविले होते. त्यापैकी पंधरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दहा जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.
तीन दिवसांपूर्वी शताब्दीनगर आणि रहेमानिया कॉलनी येथे ८ संशयितांचे रक्त नमुने तपासणीसाठी मुंबईला पा...