महाराष्ट्र

महिलांना न्यायालयीन लढाईत राज्य महिला आयोग देणार साथ: रुपाली चाकणकर
महाराष्ट्र

महिलांना न्यायालयीन लढाईत राज्य महिला आयोग देणार साथ: रुपाली चाकणकर

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे लीगल एड क्लिनिकचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य ॲड. संगीता चव्हाण, ॲड. सुप्रदा फातर्पेकर, गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी. पी. सुराणा उपस्थित राहणार आहेत. यावेळी  दूरदृश...
एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणारः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
महाराष्ट्र

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणारः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुंबई: राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियानांतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष ...
राज्यपाल कोश्यारींकडून शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख, व्हीडीओ शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल
महाराष्ट्र, राजकारण

राज्यपाल कोश्यारींकडून शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख, व्हीडीओ शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल

मुंबईः  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे राज्यपालपदावरून त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी झालेली आंदोलने ताजी असतानाच आता पुन्हा त्याच राज्यपाल कोश्यारींनी राजभवनातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भाषणाचा व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरूषांबद्दल करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यांवरून महाराष्ट्राचे राजकारण आधीच तापलेले आहे. महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्ये करण्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा बराच वरचा क्रमांक लागतो....
नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणारः महसूल मंत्री विखे
महाराष्ट्र

नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणारः महसूल मंत्री विखे

मुंबई: महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. याचदृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन ९ ते ११ डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन आज सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे ए...
कन्नडिगांची दादागिरीः बेळगावात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड, शरद पवारांचा कर्नाटकला २४ तासांचा अल्टिमेट!
देश, महाराष्ट्र

कन्नडिगांची दादागिरीः बेळगावात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड, शरद पवारांचा कर्नाटकला २४ तासांचा अल्टिमेट!

बेळगाव/मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उग्र स्वरुप धारण करताना दिसत आहे. बोम्मईंच्या चिथावणीमुळे कन्नडिगांनी दादागिरी करत कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवत तोडफोड केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर संपर्क साधला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. परिणामी सीमा भागात दहशतीचे वातावरण आहे. या सर्व परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संतप्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या संयमालाही मर्यादा आहेत. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी कर्नाटक सरकार आणि मुख्य...
‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः विद्यापीठ विकास मंचकडे कार्यकर्तेही फिरकेनात, ऐन मतदानाच्या दिवशीच दैना!
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः विद्यापीठ विकास मंचकडे कार्यकर्तेही फिरकेनात, ऐन मतदानाच्या दिवशीच दैना!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा गणासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणित अभाविपने विद्यापीठ विकास मंचच्या नावाखाली उमेदवार उभे केले आहेत.  मात्र मतदारांच्या सोयीसाठी विद्यापीठ विकास मंचने मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या मंचावर बसण्यासाठीही या पॅनलला कार्यकर्ते मिळत नसल्याचे चित्र आज पहायला मिळाले. ऐन मतदानाच्या दिवशीच विद्यापीठ विकास मंचची ही दैना पाहून मतदानाआधीच विद्यापीठ विकास मंचाने पराभव मान्य केलाय की काय?  अशी चर्चा मतदारांमध्ये ऐकायला मिळत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून आज संविधान दिनीच पदवीधर गणातून निवडावयाच्या दहा अधिसभा सदस्यांच्या निवडीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यापीठ उत्कर्ष पॅनलच्या नावाखाली उमेदवार मैदान...
मनसोक्त दारू पाजून पत्नीनेच केला पतीचा खून, ‘डबल प्रेमा’त पडल्यामुळे काढला पहिल्या प्रेमाचा काटा!
महाराष्ट्र, विशेष

मनसोक्त दारू पाजून पत्नीनेच केला पतीचा खून, ‘डबल प्रेमा’त पडल्यामुळे काढला पहिल्या प्रेमाचा काटा!

औरंगाबादः  प्रेमात पडून सुमारे बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेली एक महिला दुसऱ्यांदा प्रेमात पडली. दुसऱ्या प्रियकराच्या प्रेमात पहिला प्रियकर असलेला पती अडसर ठरू लागल्याने ‘डबल प्रेमात’ पडलेल्या आणि नंतर पतीपासून विभक्त राहू लागलेल्या महिलेने पतीला आधी मनसोक्त दारू पाजली. नंतर निर्जन स्थळी नेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी ‘डबल प्रेमा’त पडलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबादेतील एन-११ सिडको भागात राहणारे विजय संजयकुमार पाटणी (वय ३५) आणि  सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी येथे राहणाऱ्या सारिका विजय पाटणी (वय ३०) यांचा सुमारे बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आधी प्रेमात पडून आणाभाका घेतल्यानंतर हे दोघे एप्रिल २०१० मध्ये विवाहबद्ध झाले होते. प्रेमविवाहानंतर दोघांचा संसार एका तपापर्यंत गुण्यागोविंदाने चालला होता....
विषालाच ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा अचाट प्रयत्न, कटुता कशी संपणार?  शिवसेनेचा फडणवीसांना सवाल
महाराष्ट्र

विषालाच ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा अचाट प्रयत्न, कटुता कशी संपणार?  शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

मुंबईः  शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय, त्या विषालाच ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार?, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.  तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! कामाला लागा, असा सल्लाही फडणवीसांना देण्यात आला आहे.  दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबुल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुताच नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व त्या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आह...
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवली पीयूसीची मुदत संपलेली गाडी!  वादानंतर बिल्डर मालकाने दुसऱ्याच दिवशी…
महाराष्ट्र, राजकारण

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवली पीयूसीची मुदत संपलेली गाडी! वादानंतर बिल्डर मालकाने दुसऱ्याच दिवशी…

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या टेस्ट ड्राइव्हसाठी वापरलेली अलिशान मर्सिडिज बेन्झ कार कुकरेजा बिल्डरच्या मालकीची असल्याचे उघड झाल्यानंतर निर्माण झालेला वाद थांबतो न थांबतो तोच नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या या कारच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची (पीयूसी) मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हा वाद निर्माण होताच आज दुसऱ्याच दिवशी या कारच्या पीयूसीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी  हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राइव्ह घेतली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरहून शिर्डीपर्यंत या महामार्गावर मर्सिडिज बेन्झ एजी, जी ३५० डी ही एमएच ४९ बीआर ०००७ क्रमा...
पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर, एमपीएससी गतीमान!
महाराष्ट्र

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर, एमपीएससी गतीमान!

मुंबई: पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली. प्रतिदिन सुमारे २५० उमेदवारांचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून, आज २ डिसेंबर रोजी या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर त्वरीत प्रसिद्ध करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील २५० पदांवरील ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!