महाराष्ट्र

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, आजपासून पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, आजपासून पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

मुंबईः फेब्रुवारीपासूनच उन्हाचा कडाका वाढलेला असताना मार्च महिना लागताच हवामानात काहीसा बदल झालेला अनुभवायला मिळतो आहे. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चार ते आठ मार्चदरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती त्याचबरोबर अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे परंतु उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. या मिलाफामुळे चार ते आठ मार्चपर्यंत वातावरण ढगाळ राहील तसेच तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत हलक्या ते मध्य...
शाळा भरण्याच्या-सुटण्याच्या वेळी शाळेच्या आवारात दामिनी पथक व बीट मार्शल ठेवाः  रुपाली चाकणकर
महाराष्ट्र

शाळा भरण्याच्या-सुटण्याच्या वेळी शाळेच्या आवारात दामिनी पथक व बीट मार्शल ठेवाः रुपाली चाकणकर

मुंबईः मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडासारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिसिंग सेल अॅक्टिव्ह होणे गरजेचे आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेच्या आवारात दामिनी पथक व बीट मार्शल ठेवा, अशी आग्रही सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद...
आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले, मनोजभाई संसारे यांचे निधन
महाराष्ट्र

आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले, मनोजभाई संसारे यांचे निधन

मुंबईः आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते मनोज संसारे यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील झुंजार लढवय्या म्हणून त्यांची ख्याती होती. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. मनोज संसारे हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे. मनोज संसारे हे महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून मनोज संसारे यांची कारकिर्द लक्षणीय ठरली होती. मनोज संसारे हे ...
राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगीत, सरकारला आता १० मार्चचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगीत, सरकारला आता १० मार्चचा अल्टिमेटम

मुंबईः राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेले बेमुदत संप तात्पुरता स्थगीत करण्यात आला आहे. या आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय झाल्यामुळे आजपासून राज्यातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर रूजू होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बारावीच्या परीक्षेवर घातलेला बहिष्कारही मागे घेतला आहे. मागण्या मान्य करून शासन निर्णय जारी करण्यासाठी राज्य सरकारला आता १० मार्चपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग पूर्णपणे लागू करण्यात यावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि रिक्त असलेलेली शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी राज्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. शि...
औरंगाबाद महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याची ईडी’मार्फत चौकशी; एक हजार कोटींहून जास्तीच्या घोटाळ्यात अडकणार बडे मासे!
महाराष्ट्र, विशेष

औरंगाबाद महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याची ईडी’मार्फत चौकशी; एक हजार कोटींहून जास्तीच्या घोटाळ्यात अडकणार बडे मासे!

मुंबईः औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या घरकुल प्रकल्पात झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याचा आदेश प्रधानमंत्री कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील हा प्रकल्प रखडणार तर आहेच, शिवाय या प्रकल्पात अनियमिततेला खतपाणी घालणारे बडे मासेही ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने पडेगाव, सुंदरवाडी, तिसगाव, चिकलठाणा आणि हर्सूल याठिकाणी १२७ हेक्टर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. तब्बल ३९ हजार सदनिकांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. परंतु प्रकल्प उभारणीसाठी योग्य जागा नसताना आणि त्या जागेवर ३९ हजार सदनिकांचे बांधकाम शक्य नसतानाही निविदा काढण्यात आल्या होत्या. ज्या कंत्राटदाराला या बांधकामाची निविदा देण्यात आली, त्याची ए...
अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार
महाराष्ट्र

अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार

मुंबई: राज्यात अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत आलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत सदस्य रमेश पाटील यांनी शुक्रवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. जात वैधता प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी येत असतात. लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने जात पडताळणी समित्यांचे काम पारदर्शकपणे पार पडावे यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढविणे, कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कसे बदलता येईल याबाबतीतही नि...
नांदेडमध्ये ऑनर किलिंगः मेडिकलच्या २३ वर्षीय मुलीचा खून करून ओढ्यात केली राख विसर्जित
महाराष्ट्र, विशेष

नांदेडमध्ये ऑनर किलिंगः मेडिकलच्या २३ वर्षीय मुलीचा खून करून ओढ्यात केली राख विसर्जित

नांदेडः देशभरात गुरूवारी प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज नांदेड जिल्ह्यातील ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडजवळील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहीपाल येथील कुटुंबीयानीच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या २३ वर्षीय मुलीचा निष्ठूरपणे खून करून तिचा मृतदेह परस्पर जाळला आणि राख ओढ्यात विसर्जित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या ऑनर किलिंगला बळी पडलेल्या मुलीचे नाव शुभांगी जोगदंड आहे. २३ वर्षीय शुभांगी नांदेडमधील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातीलच तरूणासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध होते. परंतु तिच्या कुटुंबीयांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते. हेही वाचाः नांदेडचे बिल्डर बियाणींच्या हत्याप्रकरणात शार्पशूटर रंगाला एनआयएकडून अटक, हत्याकटाचे धागेदोरे उलगडणार? शुभांगीच्या प्रे...
महाराष्ट्राला ७४ ‘पोलिस पदक’ जाहीर, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक! वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र, विशेष

महाराष्ट्राला ७४ ‘पोलिस पदक’ जाहीर, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक! वाचा संपूर्ण यादी

नवी दिल्ली:  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना पदक जाहीर झाले आहेत. यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट पोलिस सेवा पदक’ (पीपीएम), ३१ ‘पोलिस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलिस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलिस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९०१ ‘पोलिस पदक’ जाहीर झाली असून ९३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक' (पीपीएम), १४० पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६८ पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (पीएम) जाहीर झाले असून यात महाराष्ट्राला एकूण ७४ पदके जाहीर झाली आहेत. देशातील ९३ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती  विशिष्ट सेवा पद...
चिंचवड, कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या, निवडणूक आयोगाने जाहीर केले नवीन वेळापत्रक
महाराष्ट्र, राजकारण

चिंचवड, कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या, निवडणूक आयोगाने जाहीर केले नवीन वेळापत्रक

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभेच्या चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केला आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या इयत्ता बारावी व पदवीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचे कारण देत या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेल्या तारखांनुसार चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते आणि २ मार्च रोजी मतमोजणी करून निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार होते. अरूणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमधील विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांबरोबरच चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या तारखांना  इयत्ता बारावी आणि पदवीच्या परीक्षा घेण्यात असल्याचे पुण्याच्या जि...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राजकीय वातावरण तापले!
महाराष्ट्र, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राजकीय वातावरण तापले!

मुंबईः ठाण्यातील व्हिव्हीयाना सिनेमागृहात सोमवारी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचा शो बंद पाडला होता.  आ. आव्हाड यांच्या अटकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी रात्री व्हिव्हीयाना सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू झाल्यानंतर या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही सिनेमागृहात बसून राहिलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!