‘वेतन फसवेगिरी’फेम डॉ. गणेश मंझांच्या नियुक्तीतही झोलझाल, नियुक्ती धारणाधिकारावर पण आदेशात मात्र खोेट!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शिक्षकेत्तर संवर्गातील नियुक्ती असूनही फसवेगिरी करून शिक्षक संवर्गाची वेतनश्रेणी लागू करून घेऊन शासकीय तिजोरीवर डल्ला मारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागातील उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्या मूळ नियुक्तीतच झोलझाल असल्याचे धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. डॉ. गणेश मंझा हे नियमबाह्यपणे विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत असल्याचेच या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.
डॉ. गणेश मंझा यांची २८ जुलै २००८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिवपदावर नियुक्ती करण्यात आली. ते ५ सप्टेंबर २००९ रोजी विद्यापीठाच्या सेवेत रूजू झाले आणि त्यांना विद्यापीठाच्या उपकेंद्रात पोस्टिंग देण्यात आली होती. उपकुलसचिव हे पद शिक्षकेत्तर संवर्गातील असून नियुक्तीच्या वेळी ते १०६५०-३२५-१५८५० या वेतनश्रेणीत सहाव्या वेतनबँ...