वजन कमी करण्यासाठी साखरेला पर्याय म्हणून तुम्ही कृत्रिम स्वीटनर वापरताय का?; सावध व्हा, हे आहेत गंभीर धोके!
जिनिव्हाः तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर शुगर म्हणजेच साखरेच्या अन्य पर्यायांचा अजिबात वापर करू नका. साखरेला पर्याय म्हणून वापरले जाणारे कृत्रिम स्वीटनर अत्यंत धोकादायक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनेच (WHO) तसा इशारा दिला आहे. साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम स्वीटनरचा वापर केल्यामुळे वयस्क किंवा मुलांच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कोणताही दीर्घकालीन लाभ होत नाही. उलट त्याच्या वापरामुळे होणारे तोटेच अधिक आहेत. कृत्रिम स्वीटनरचा सातत्याने वापर केल्यामुळे वयस्कांमध्ये टाइप-२ चा मधुमेह, ह्रदय व रक्त वाहिन्यांशी संबंधित आजार आणि मृत्युदराची जोखीम वाढते, असे उपलब्ध पुराव्यांची व्यवस्थित समीक्षा केल्यानंतर स्पष्ट झाले आहे, असे हूने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने साखरेसह स्वीटनरच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. साखरेला साखरविरहित स्वीटनरमध्ये बदलल...