उपवासाला भगर खाताय? बुरशीयुक्त भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका, अशी घ्या खबरदारी!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उपवासाला फराळ म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या भगरीला जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अन्नविषबाधा होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर विक्री करतांना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कळवले आहे.
भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परगिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेली अशी भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.
अशी घ्या काळजी
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली...