पुरोगामी महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर ‘दैवतीकरण’, प्रजासत्ताक दिन संचलनात साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ
मुंबई: फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची पुरोगीमी ओळख आता इतिहासजमा होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हावा त्या दिशेने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुरोगामी राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांचा चित्ररथ सामील करणार आहे. हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवर होणारे दैवतीकरण तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या प्रेसनोट नुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आ...