Blog

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!
महाराष्ट्र

 बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!

अहमदनगरः मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येते का पहा. कुणाच्या मागे चाललात तुम्ही? अशा शब्दांत ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा गोफ्यस्फोटही भुजबळांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजातील गणगोत आणि सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसीत समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना काढली. त्यावरून राज्यभरातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आणि रस्त्यावर उतरून लढाईचे रणशिंग फुंकले. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी राज्य सरकारच्या व...
उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!
महाराष्ट्र, विशेष

उच्च शिक्षण विभागात १० हजार कोटींचा अनुदान घोटाळा, अनुदान दिले पण निर्धारणच न केल्यामुळे संस्थाचालकांनी गिळल्या रकमा!

सुरेश पाटील/ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्याच्या उच्च शिक्षण विभागात एक दोन नव्हे तर तब्बल १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना दरमहा नियमित अनुदान तर दिले परंतु त्या अनुदानाचा योग्य विनियोग झाला की नाही, याचे दरवर्षी अनुदान निर्धारणच केले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या बँक खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमा संस्थाचालकांनी गिळंकृत करून टाकल्या. त्यातून हा कोट्यवधींचा घोटाळा झाला. औरंगाबाद विभागातील अनुदान घोटाळ्याची ही रक्कम एक हजार कोटींच्या घरात जाते, अशी माहिती उच्च शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली.  राज्याच्या ३६ जिल्ह्यात एकूण ४ हजार ३४६ अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये आहेत. त्यापैकी २ हजार ५७० कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये कायम विनाअनुदानित तत्वावर आहेत...
मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत
देश, राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा फैसला कधी? सुप्रीम कोर्टाची विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना नोटीस, दोन आठवडे मुदत

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सध्या कोणती प्रक्रिया सुरू आहे? अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली असून या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी आज झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी लागणार आहे. सर्व...
ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा
देश

ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा

नवी दिल्लीः  एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.  रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आहे...
महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
देश, महाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत, राज्यात महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस प्रसुती रजा
महाराष्ट्र

मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत, राज्यात महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस प्रसुती रजा

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्या म्हणाल्या, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘कम अर्ली-गो अर्ली’ या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच सुमारे ३० म...
कन्नडमध्ये मानसिंग पवार आणि टोळीने प्लॉटिंग करून विकलेल्या संस्थेच्या जागेवर कोणाकोणाचे बंगले?, आता जागा ताब्यात घेण्याचे सहधर्मादाय आयुक्तांचे आदेश
महाराष्ट्र, विशेष

कन्नडमध्ये मानसिंग पवार आणि टोळीने प्लॉटिंग करून विकलेल्या संस्थेच्या जागेवर कोणाकोणाचे बंगले?, आता जागा ताब्यात घेण्याचे सहधर्मादाय आयुक्तांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदच्च्युत अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार आणि त्यांच्यासोबत विश्वस्त मंडळात असलेल्या टोळीने प्लॉटिंग करून विकलेल्या संस्थेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर सध्या टोलेजंग बंगले उभे आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सह धर्मादाय आयुक्तांनी मानसिंग पवारांसह नऊ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी करतानाच संस्थेच्या मालकीची ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश संस्थेच्या विश्वस्त मंडळाला दिले आहेत. विशेष म्हणजे रोख रक्कम मोजून प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉटधारकांनीच अतिक्रमण केले, असे भासवण्याचा प्रयत्न मानसिंग पवार यांनी केला. आता संस्थेचे विद्यमान विश्वस्त मंडळ ही जागा ताब्यात घेण्याची कारवाई कधी आणि कशी सुरू करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कन्नडच्या श्री छत्रपती शि...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करणार, पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही चौकशी सुरू
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करणार, पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही चौकशी सुरू

मुंबई: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर व जिल्ह्यात बनावट सह्या आणि बनावट आदेशांचा वापर करून सरकारी जमिनींचे व्यवहार करण्याच्या अनेक तक्रारी समोर येत असल्याने या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आ. प्रविण दरेकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सरकारी जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. आ. सतेज पाटील, शिवाजीराव गर्जे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले. छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या-शिक्क्यांचा वापर करून सरकारी जमिनीबाबत बनावट आदेश तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शा...
मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील हॉकर्सना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार
महाराष्ट्र

मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील हॉकर्सना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार

मुंबई: मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा (पिचेस) उपलब्ध करून देण्याचे महापालिकेला निर्देश देण्यात येतील, अशी माहिती  मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहरात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत लक्षवेधी प्रश्न आमदार रईस शेख यांनी उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २०१४ मध्ये हॉकरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी १,२८,४४३ अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी ९९,४३५ अर्ज महानगरपालिकेला प्राप्त झाले असून त्यातील ३२,४१५ पथविक्रेते अधिकृतपणे पात्र ठरले आहेत. हॉकर्सच्या प्रश्नावर विविध संघटनांनी न्याया...
महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणारः उच्च शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
महाराष्ट्र

महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणारः उच्च शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई:  राज्यातील महाविद्यालयांमध्ये विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पावले उचलली असून शुल्क नियामक प्राधिकरणाकडून आता ट्युशन फीबरोबरच इतर शुल्कांवरही नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून जादा शुल्क आकारल्याबाबत विधानसभा सदस्य अस्लम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पाटील बोलत होते. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी करून भुसावळ येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत घेतली असून त्यावर दंडही आकारण्यात आला आहे. हा दंड विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरण्यात य...
कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले यांची ‘बोगस’ नियुक्तीही ठरली मानसिंग पवारांच्या शैक्षणिक साम्राज्याच्या पतनात कळीचे कारण!
महाराष्ट्र, विशेष

कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले यांची ‘बोगस’ नियुक्तीही ठरली मानसिंग पवारांच्या शैक्षणिक साम्राज्याच्या पतनात कळीचे कारण!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  कन्नडच्या शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. व्ही.एन. भोसले यांची ‘दुहेरी बोगस’ नियुक्ती हेही छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध उद्योगपती व शिक्षण सम्राट मानसिंग बाळासाहेब पवार यांच्या ‘श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळा’वरील एकहाती साम्राज्याच्या पतनाचे कळीचे कारण ठरले आहे. डॉ. भोसले हे संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मानसिंग पवार यांनी त्यांची वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आणि संस्थेच्या खात्यातून त्यांना वेतन अदा करून निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह धर्मादाय आयुक्त आर.एस. पावसकर यांनी मानसिंग पवार यांच्यासह नऊ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे...
उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची कन्नडच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी, सह धर्मादाय आयुक्तांचा दणका
देश, विशेष

उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची कन्नडच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळातून हकालपट्टी, सह धर्मादाय आयुक्तांचा दणका

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कन्नड येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीच्या जागेचे संरक्षण करण्याऐवजी त्या जागेवर प्लॉटिंग करून त्या भूखंडांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी आणि संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापकपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीस संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकपदी नियुक्ती करून त्याला कोणतेही व्याज न आकारता संस्थेची रक्कम वापरू दिल्याप्रकरणी दोषी ठरवून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह धर्मादाय आयुक्त आर.एस. पावसकर यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार यांच्यासह ९ जणांची संस्थेच्या विश्वस्त मंडळावरून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या मालमता व निधीचा गैरवापर करणाऱ्या संस्थाचालकांना चांगलाच चाप बसणार आहे. छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानस...
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी-२०२६: राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित, राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर!
देश, महाराष्ट्र

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी-२०२६: राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित, राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर!

मुंबई: राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला. आर्थिक पाहणी अहवालानुसार २०२५-२६ मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ५१,००,५९७ कोटी रुपये इतके अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न २८,८२,६९९ कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याचे दरडोई उत्प...
अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारणार
महाराष्ट्र

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.  त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली. नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच उपचार सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयातील आरोग्य...
हम करे सो कायदा: व्यवस्थापन परिषदेचा निर्णय पायदळी तुडवत कुलगुरू डॉ. विजय फुलारींनी केली मराठी विभागप्रमुखपदी डॉ. रमेश जाधवांची नियुक्ती!
महाराष्ट्र, विशेष

हम करे सो कायदा: व्यवस्थापन परिषदेचा निर्णय पायदळी तुडवत कुलगुरू डॉ. विजय फुलारींनी केली मराठी विभागप्रमुखपदी डॉ. रमेश जाधवांची नियुक्ती!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  विद्यापीठाची प्रमुख कार्यकारी व धोरणात्मक प्राधिकारी असलेल्या व्यवस्थापन परिषदेने सहा वर्षांपूर्वी सर्वानुमते मंजूर केलेला ठराव अद्याप अस्तित्वात असताना तो ठराव पायदळी तुडवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मराठी विभागप्रमुखपदी डॉ. रमेश जाधव यांची नियुक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश जाधव यांच्याबाबत मराठी विभागातील विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि सहकारी प्राध्यापकांनी तत्कालीन कुलगुरूंकडे असंख्य तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन कुलगुरूंनी डॉ. सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत आपला अहवाल कुलगुरूंकडे सादर केला होता. हेही वाचा...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!