मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवारांसाठी रोजगाराभिमुख मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु


मुंबई: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे आणि एमएसएमई टेक्नॉलॉजी  सेंटर – इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), अंतर्गत देण्यात येणाऱ्या  कौशल्य विकास  प्रशिक्षणासाठी पुढील तुकडीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या दहावी,बारावी, आयटीआय, डिप्लोमा/डिग्री (इंजिनियरिंग) झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी सारथी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच, जाहिरात व प्रवेश प्रक्रियेसाठी आयजीटीआर या संस्थेच्या www.igtr-aur.org या संकेतस्थळावर भेट देवून आपला प्रवेश निश्चित करावा.

सारथी  व  आयजीटीआर अतंर्गत  छत्रपती संभाजीनगर या राज्य व केंद्र शासनाच्या नामांकित संस्थेमधील सामंजस्य करारातंर्गत मागील एक वर्षात मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या ७४१ युवक युवतींना विविध प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रवेश देण्यात आला आहे.

त्यापैकी ३८९ प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले असून १७१ उमेदवारांना राज्यातील विविध शहरात वेगवेगळ्या नामांकित खाजगी उद्योगात रोजगार मिळवून देण्यात आला आहे. 

या प्रशिक्षणार्थींना रुपये दीडलाख ते सहा लाखापर्यंत वार्षिक वेतनाच्या  नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ३५२ प्रशिक्षणार्थी सद्यपरिस्थितीत प्रशिक्षण घेत आहेत. 

या सर्व प्रशिक्षणार्थींना पुणे येथील नामांकित उद्योग समूह, जय हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, लिअर कार्पोरेशन, डिझाईन टेक, निल सॉफ्ट तसेच बंगलोर येथील टाटा फ्लेक्सि व औरंगाबाद येथील सिमेंस लिमिटेड, मान एनर्जी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडूरंस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, बडवे इंजीनियरिंग लिमिटेड, व्हेरॉक इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन, आयजीटीआर अशा नामांकित उद्योग समूहामध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. बरेच उद्योग समूह उरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्यास उत्सुक असल्याचे  प्रसिद्धीपत्रात नमूद आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!