स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अनुसूचित जातीव व नवबौद्ध घटकातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येते. या योजनेतंर्गत अनुसुचितजाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना घरभाडे व इतर खर्च भागवण्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.

सन २०२४-२५ या शैक्षणीक वर्षापासून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची मुदत शनिवारपर्यंत (१५ मार्च) वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक खात्याचा तपशील भरण्याकरीता टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रदीप भोगले यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!