कोहिनूर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गिळले विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या कामकाजाच्या मानधनाचेही पैसे!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर-२०२४ महिन्याचे वेतन अनुदान अचानक राज्य सरकारकडे परत केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या कामकाजाच्या मानधनाचा एक छदामही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वितरित न करता स्वतःच्याच घश्यात घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे केंद्र आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेचे कामकाज करणारे केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपीक, वॉटर बॉय, शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून ठराविक दराने मानधन देण्यात येते.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

गेल्या वर्षीपर्यंत परीक्षेच्या कामकाजाच्या या मानधनाची एकत्रित रक्कम विद्यापीठाकडून थेट महाविद्यालयाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत होती. विद्यापीठाकडून प्राप्त झालेली ही रक्कम संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वितरित करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर होती. आता गेल्या वर्षीपासून विद्यापीठाने या रचनेत बदल केला असून ही रक्कम आता परीक्षेचे कामकाज करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!

हेही वाचाः शासनाकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एकाच तुकडीला मंजुरी असतानाही चार-चार तुकड्या दाखवून कोहिनूर महाविद्यालयाची खुलेआम दुकानदारी!

कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विद्यापीठाचे परीक्षा केंद्र मिळाल्यापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षेच्या कामकाजासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राबवून घेतले परंतु या कामाच्या मोबदल्यात विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या मानधनाच्या रकमेपैकी एक छदामही एकाही सत्रात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वितरित केला नाही. वर्षानुवर्षे विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या या मानधनाच्या रकमा महाविद्यालयाच्या प्रशासनाने स्वतःच्याच घश्यात घातल्या आहेत.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले चार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस, जीपीएफचेही लक्षावधी रुपये; आता तरी कारवाई होणार का?

कोहिनूर महाविद्यालयाचे प्रशासन आणि व्यवस्थापनाची दहशत आणि बेबंदशाहीमुळे वर्षानुवर्षे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचे कामकाज करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी याबाबत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे फावले आणि परीक्षेच्या कामकाजापोटी प्राप्त झालेल्या मानधनाच्या रकमा स्वतःच्याच घश्यात घालत राहिले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हे आर्थिक शोषण गेल्या वर्षीपर्यंत सुरूच राहिले.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाचे व्यवस्थापन हस्तांतरित होणार अन्य व्यवस्थापनाकडे?, विभागीय सहसंचालकांच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष!

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयातील गैरव्यवस्थापनाच्या चौकशीसाठी विद्यापीठाने स्थापन केली पाच सदस्यीय समिती, उद्या काढणार महाविद्यालयाचा ‘ए टू झेड’ एक्स रे!

चौकशी समितीला हे आर्थिक शोषणही दिसणार का?

कोहिनूर महाविद्यालयातील गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी चार विद्यमान व एका माजी अधिष्ठातांचा समावेश असलेली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही चौकशी समिती आज खुलताबादेत जाऊन कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाच्या प्रश्नाबरोबरच महाविद्यालयात चालवले जाणारे अभ्यासक्रम आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सोयीसुविधा व मान्यता प्राप्त अध्यापकांची उपलब्धता याची चौकशी करत आहे. या चौकशीबरोबरच कोहिनूर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने वर्षानुवर्षे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परीक्षेच्या कामकाजाचे मानधन लाटून जे आर्थिक शोषण केले, त्याचीही चौकशी ही समिती करणार का? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!