Tag: shivsena narendra modi sushma andhare

मोदींची नक्कल भोवली, शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल, म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने….
महाराष्ट्र, राजकारण

मोदींची नक्कल भोवली, शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल, म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने….

मुंबईः शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ‘प्रक्षोभक भाषण’ केल्याप्रकरणी शिवसेनेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विनायक राऊत, आ. भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा? पोलिसांच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देईन, असे अंधारे म्हणाल्या. हेही वाचाः ‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यात आली. अन्य नेत्य...