महाराष्ट्राचे राज्यपाल, विधानसभाध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर; पण उद्धव ठाकरे सरकार पुन्हा आणू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांनीही घेतलेले निर्णय बेकायदेशीर होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आम्ही हे सरकार पुन्हा आणू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापीठाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकर घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम.आर. शहा, कृष्णा मुरारी, हीमा कोहली, पी. एस. नरसिम्हा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. न्या. चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही. जर तत्कालीन मुख...