Tag: karnataka assembly election result bjp congress

नरेंद्र मोदींवर ‘बजरंग बली कोपला’: कर्नाटकात भाजप चारी मुंड्या चित, कन्नडिगांचे काँग्रेसला एकतर्फी बहुमत!
देश, राजकारण

नरेंद्र मोदींवर ‘बजरंग बली कोपला’: कर्नाटकात भाजप चारी मुंड्या चित, कन्नडिगांचे काँग्रेसला एकतर्फी बहुमत!

बंगळुरूः पराभव दृष्टीपथात दिसताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना ‘जय बजरंग बली बोलो और कमल का बटन दबाओ’ अशी साद घालूनही त्यांना बजरंग बली पावला नाही. उलटपक्षी बजरंग बलीचा मोदींवर कोप झाल्यामुळे कर्नाटकच्या मतदारांनी भाजपला चारी मुंड्या चित करत काँग्रेसला एकतर्फी बहुमत बहाल केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत १३६ जागांवर आघाडी (विजयी ११९) घेतली असून भाजपचे दुकान केवळ ६४ जागांवरच गुंडाळले असल्याचे चित्र आहे. कर्नाटकमधील या अभूतपूर्व यशामुळे भाजपविरोधी शक्तींचा आत्मविश्वास दुणावला असून कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांची नांदी असल्याचा ठोकताळा ते बांधू लागले आहेत. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. या निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांन...
error: Content is protected !!