Tag: gyanpeeth awards2024

ख्यातकिर्त कवी गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव
देश

ख्यातकिर्त कवी गुलजार आणि रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव

नवी दिल्ली: लोकप्रिय उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुलजार यांच्यासोबतच संस्कृत पंडित रामभद्राचार्य यांनाही ज्ञानपीठ जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने आज या दोघांच्या नावाची घोषणा केली. ज्ञानपीठ हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. भारतीय साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल भारतीय ज्ञानपीठ स्ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळम कवी जी. शंकर कुरूप यांना त्यांच्या ओडक्कुझल या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. ११ लाख रुपये रोख, मानपत्र आणि वाग्देवीची कांस्यमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे उर्दू कवी, शायर अशी ओळख असलेले गुलजार यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. कवी गुलजार यांचे संपूर्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!