सुट्ट्यांच्या दिवशीही दस्तनोंदणी कार्यालये सुरू राहणार


मुंबई: आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

 २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या दिवशी सह जिल्हा निबंधक, मुंबई शहर यांच्या अधिपत्याखालील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ ते १५ ही सर्व कार्यालये नियमित शासकीय कामकाजासाठी कार्यरत राहतील.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत असल्याने गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई शहरचे सह जिल्हा निबंधक भरत गरुड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!